मरियमच्या जीवावर उठलंय पाकिस्तान सरकार!

मरियम नवाजला लष्कराकडून मारण्याची धमकी दिली जात आहे.
Navaj Sharif Warns pakistan government over threat to mariyam navaj
Navaj Sharif Warns pakistan government over threat to mariyam navaj

कराची : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज)चे प्रमुख नवाज शरीफ यांनी पंतप्रधान, सरकार आणि आयएसआयवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांची मुलगी मरियम नवाजला लष्कराकडून मारण्याची धमकी दिली जात आहे. मुलीला काही झाल्यास त्याला पंतप्रधान आणि लष्करप्रमुख जबाबदार असतील, असा इशारा शरीफ यांनी दिला आहे. 

शरीफ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान, लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा, आयएसआय चीफ जनरल फैज हमीद आणि जनरल इरफान मलिक यांना थेट इशारा दिला आहे. पाकिस्तानी लष्कराने देशातील लोकशाहीला पायदळी तुडवले आहे. त्यांनी मुलगी मरियमच्या हॉटेलचा रात्री दरवाजा तोडला. आता तिला जीव घेण्याची धमकी दिली जात आहे, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठराक जिंकला असला तरीही त्यातही गडबड केली आहे. लष्कराने इम्रान खान यांना जबरदस्तीने जनतेच्या माथी मारले आहे. त्यांनी पाकिस्तानला बरबाद केले. सिनेट निवडणुकीत सत्ताधारी उमेदवाराच्या पराभवानंतर लष्कराने विश्वासदर्शक ठरावावेळी इम्रान खान यांची मदत केली. ते कुणापासूनही लपलेले नाही. तरीही लष्कर म्हणत आहे की, आम्हाला राजकारणात ओढू नका, असा आरोप शरीफ यांनी केला आहे. 

मरियमला येणाऱ्या धमक्यांविरोधात ती खंबीरपणे उभी आहे. ती लोकशाहीची लढाई लढत आहे. तिला धमकी देणाऱ्यांनी सावध राहावे. तिच्यासोबत काही चुकीचे झाले तर त्याला इम्रान खान यांच्याप्रमाणेच बाजवा, फैज हमीद, इरफान मलिकहेही जबाबदार असतील. तुम्ही जे करत आहात, हा गंभीर गुन्हा आहे. त्याचा हिशेब तुम्हाला लवकरच द्यावा लागेल, असा इशारा शरीफ यांनी दिला आहे. 

शरीफ हे सध्या लंडनमध्ये आहे. २०१९ मध्ये ते लंडनला गेले आहेत. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना परदेशात जाण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. त्यांनी ट्विटरवर टाकलेला व्हिडिओही तिथेच रेकॉर्ड केला आहे. शरीफ यांनी यापूर्वीही पाकिस्तानी लष्करावर अनेकदा टीका केली आहे. 

मरियम यांनीही यापूर्वी सरकारवर टीका केली आहे. आपल्याला केवळ धमकावलेच नाही तर अपमानजनक भाषाही वापरली. संसदेतील सदस्यांना इम्रान खान यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. ज्यांना त्याला विरोध केला त्यांच्या दडपशाही करण्यात आली. सरकारने ससंदेला एका बंकरमध्ये बदलले आहे, असा आरोप मरियम यांनी केला आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com