हुश्श! १६९ दिवस चाललेले शेतकरी आंदोलन थांबले, पण...

तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुमारे साडे तीन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे.
Farmers protest to oppose agriculture acts in amritsar finished
Farmers protest to oppose agriculture acts in amritsar finished

अमृतसर : तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुमारे साडे तीन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. ठिकठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा काढून कृषी कायद्यांना विरोध केला जात आहे. पण काही ठिकाणी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आंदोलनातून माघारही घेतली आहे.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील अमृतसरमध्येही शेतकरी रेल्वे मार्गावरच आंदोलनाला बसले होते. तब्बल १६९ दिवस हे धरणे आंदोलन सुरू होते. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी, प्रवासी वाहतुकीसह शेतकरी व व्यापाऱ्यांना माल वाहतुक करता येत नव्हती. त्याचा फटका सर्वच घटकांना बसत होता.

केंद्र सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोपर्यंत दिल्लीतील आंदोलन थांबणार नसल्याचे शेतकरी संघटनांनी स्पष्ट केले आहे. पण अमृतसरमध्ये सुरू असलेले हे आंदोलन थांबविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे तब्बल १६९ दिवसांनंतर शेतकरी घरी परतले असून रेल्वे सेवाही सुरू झाली आहे. 

अमृतसरमधील जंडियाला गुरू रेल्वे स्टेशन परिसरात हे आंदोलन सुरू होते. आंदोलन संपल्यानंतर आता अमृतसरवरून दिल्लीसाठी रेल्वे सुरू झाली आहे. आंदोलनामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. केवळ मोजक्याच गाड्या अन्य मार्गाने चालविल्या जात होत्या. आता रेल्वेसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दिल्लीतील टिकरी, सिंघु आणि गाजीपुर सीमेवर आंदोलन सुरूच राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. 

भारत बंदचे आवाहन

शेतकरी आंदोलनाला २६ मार्च रोजी चार महिने पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शेतकरी नेते बूटा सिंह बुर्जगिल यांनी दिलेल्या माहितीनुसार १५ मार्च रोजी शेतकरी आणि व्यापारी संघटना मिळून इंधन दरवाढ आणि रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन करतील. खासगीकरणाविरोधात पूर्ण देशातील रेल्वे स्थानकांवर आंदोलन केले जाईल. त्यानंतर २६ मार्च रोजी भारत बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बंद शांततापूर्ण मार्गाने केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com