Nashik Slum Rehab Issue | Sarkarnama

नाशिक झोपडपट्टी पूनर्वसन - बेघर झाले 30; घरे वाटली 180

संपत देवगिरे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नाशिक : आमदार, नगरसेवक आणि अधिकारी एकत्र आल्यावर काय करामती होऊ शकतात याचा नमुना शहरातील घरकुल घोटाळा ठरला. रस्ता रुंदीकरणासाठी तीस घरे पाडली. मात्र पुर्नवसनाची यादी करतांना 180 जणांची यादी केली. गंमत म्हणजे ज्यांच्यामुळे पुर्नवसनाचा निर्णय झाला ते तीस कुटुंबे गेली पाच वर्षे घराच्या प्रतिक्षेत आहेत.

नाशिक : आमदार, नगरसेवक आणि अधिकारी एकत्र आल्यावर काय करामती होऊ शकतात याचा नमुना शहरातील घरकुल घोटाळा ठरला. रस्ता रुंदीकरणासाठी तीस घरे पाडली. मात्र पुर्नवसनाची यादी करतांना 180 जणांची यादी केली. गंमत म्हणजे ज्यांच्यामुळे पुर्नवसनाचा निर्णय झाला ते तीस कुटुंबे गेली पाच वर्षे घराच्या प्रतिक्षेत आहेत.

शहराच्या प्रभाग तेवीस मध्ये महापालिकेने एकोणीस कोटी रुपये खर्चुन सदनिका बांधल्या. त्यासाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुर्नत्थान योजनेचा निधी खर्च केला. मात्र जेव्हा घरे तयार झाली तेव्हा त्यात चक्क एका कुुटंबाला पाच- सात सदनिका दिल्याचे उघड झाले. याविषयी भाजपच्या स्थानिक आमदार, नगरसेवक आणि महापालिकेचे झोपडपट्टी पुर्नवसन अधिकारी यांची नावे असलेले पत्रच आयुक्तांना दिले. मात्र त्याची शहनीशा करण्याचे कष्टही अधिकाऱ्यांनी घेतले नाही असे स्पष्ट झाले.

विकास आराखड्यातील भारतनगर शंभर फुटी रोड रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढले. त्यात तीस घरे पाडली. त्यांचे पुर्नवसन करण्याऐवजी स्थानिक नगरसेवक तथा भाजप नेते यशवंत निकुळे यांनी या कुुटंबांना जवळच्याच उर्दु शाळेत स्थलांतरीत केले. त्याचा पंचनामा बाजुला ठेवण्यात आला. नवा पंचनामा करुन थेट 180 कुुटंबे बाधीत झाल्याचे नमुद केले. या 180 जणांनी सदनिका वितरीत केल्या. या सर्व लोकांची शहरात चांगल्या भागात घरे आहेत. त्यामुळे त्यांनी अनामत रक्कमा घेऊन ही घरे भाड्याने दिली. एका कुुटंबातील पाच जणांना, शहरात परशस्त बंगल्यात राहणाऱ्याच्या कुुटंबाला दोन, अन्य एकाला पाच अशी खीरापतींसारखी घरकुले मिळाली. तब्बल अडुसष्ट सदनिकांचे लाभार्थी संशयास्पद आहेत. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात जाऊन त्याचे सर्व्हेक्षणकेले. त्याचा सविस्तर अहवाल महापालिकेला दिला. त्यामुळे महापालिकेचे एकोणीस कोटी खर्च झाले. अतिक्रमण जैसे थे राहिले. ज्यांची घरे गेली त्यांना महापालिकेच्या शाळेची जागा दिली. व भलत्याच 180 जणांना घरे दिली. हे सर्व नगरसेवकांचे नातेवाईक, कुटुंबीय, राजकीय वरदहस्त असलेल्यांना मिळाल्या. अशा प्रकारे घडलेला घरकुल घोटाळा सध्या प्रशासनावर चांगलेच शेकण्याची स्थिती आहे.

कारवाई करावीच लागेल : पाटील
यासंदर्भात सरकारनामा वेबपोर्टलवर वृत्त प्रसारीत होताच ती चर्चेचा विषय ठरली. यासंदर्भात आज कॉंग्रेसच्या पश्‍चिम प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी संबंधीतांशी संपर्क चर्चा केली. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पत्र दिले. यासंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. निवेदनात भाजपचे नगरसेवक, राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे संबंधीतांवर दोन दिवसांत कारवाई करावी. अन्यथा याविषयी शहरात आंदोलन करण्यात येईल असे नगरसेविका पाटील यांनी सांगितले.

आधीच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा -

13 वर्षांच्या मुलाला दिले महापालिकेचे घर

झोपडपट्टीचे पुनर्वसानाचे लाभार्थी ठरले भाजप आमदारांच्या घरी!

 

संबंधित लेख