if party tells ready to speak in loksabha | Sarkarnama

पक्षाने सांगितले तर लोकसभेतही बोलायला आवडेल : गिरीश बापट

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

विधीमंडळ कामकाजमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. टेल्को कंपनीतील कामगार ते राज्याचा मंत्री अशी मजल त्यांनी मारली आहे. मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांचा हा प्रवास समजून घेणे म्हणजे राजकारण कळणे. सरकारनामा फेसबुक लाइव्हमध्ये त्यांनी हा प्रवास उलगडून दाखवला. त्यांच्या मुलाखतीचा हा तिसरा भाग. 

प्रश्न : पुणे भाजपात जास्त बोलणारे लोक आहेत, असे तुम्ही मध्यंतरी म्हणालात. या जास्त बोलणाऱ्या लोकांना लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. तुम्हालाही लोकसभेत बोलाण्याची इच्छा आहे का?
उत्तर : पक्ष सांगेल तेथे मी बोलेल. मी जन्मापासून पक्षाशी निष्ठावंत आहे. मी आत्ता पक्षात आलेला नाही. आतापर्यतं पक्षाने जे सांगितले ते मी करत आलो आहे. आणीबाणीत पक्षाने सांगितले सत्याग्रह करा मी केला. पक्षाने महापालिकेत नगरसेवकपदासाठी उभे राहण्यास सांगितले. त्यांनतर आमदारकीसाठी उभे राहायला सांगितले. पक्ष सांगितले ते मी आतापर्यंत करत आलो आहे. त्यामुळे पक्ष सांगेल ते माझ्यासाठी अंतिम असेल. उमेदवार आमचे लोक ठरवतील. उमेदवार जो कोळी असे तो असेल. मात्र पुण्याचा खासदार भाजपाच निवडून येणार आहे. 

प्रश्न : पक्षाने तुम्हाला लोकसभेसाठी तयारी करायला सांगितले आहे का ? 

उत्तर : पक्ष असे कधी सांगत नसतो. त्या-त्यावेळी जे करावे लागते त्याप्रमाणे त्यावेळी पक्ष सांगत असतो. आजपर्यंत पक्षाने वेळोवेळी जे सांगितले ते मी केले आहे. पदाधिकारी म्हणून, नगरसेवक, आमदार, मंत्री म्हणून पक्षाने जे सांगितले ते मी करत आलो आहे. पक्ष माझ्यासाठी महत्वाचा आहे.

प्रश्न : तरीही तुम्हाला लोकसभेत बोलायला आवडेल की विधानसभेत ? 

उत्तर : मला चौकात उभे केले तरी बोलायला आवडेत. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यामुळे लोकसभा काय विधानसभा काय मला कुठेही बोलायला आवडेल. शहर पातळीवर, राज्य पातळीवर व देशपातळीवर विचारले तर कुणालाही देशपातळीवर काम करायला आवडेल. शेवटी पक्षाचा मी शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेवटी पक्ष सांगेल तेच मी करणार आहे. 

प्रश्न : भाजपा-शिवसेना युतीबद्दल आपणास काय वाटते. युती झाली तर पुण्यातील जागांबाबत काय होईल ? 

उत्तर : किती जागा, कोणत्या जागा कोण एक नंबर कोण दोन नंबर या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत बाबी आहेत. राज्य पातळीवर, शहर पातळीवर याबाबतचा निर्णय आमच्या नेत्यांवर सोपविला आहे. ते योग्य तो निर्णय होतील. मात्र आमच्यात युती होईल याबाबत विश्वास आहे. 

प्रश्न : पुण्यात भाजप त्याग करायला तयार आहे का ? 

उत्तर : भाजपाने नेहमी त्यागच केला आहे. त्यामुळे भाजपाला कुणी त्याग शिकवू नये, पुणे असो की दिल्ली आमचा पक्षच मुळी त्यागावर उभारलेला आहे. पक्षाची संपूर्ण वाटचाल त्यागावर आधारलेली आहे. त्यामुळे याबाबत कुणी बोलण्याची गरज नाही. 

आधीच्या बातम्या- विधीमंडळातील भाषणांतून जे समजतं ते दहा पुस्तकांतूनही कळत नाही : बापट 

पुण्यासाठी चर्चेत वेळ घालवत नाही; निर्णय घेतो : बापट

 

संबंधित लेख