दोन्ही मुंडेंना वगळून सकल वंजारी समाज समन्वय समिती : वाढीव आरक्षणासाठी लढा देणार

गोपीनाथ गडावर लवकरच मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईलल, असे कराड यांनी सांगितले.
vanjari-samiti
vanjari-samiti

पुणे : वंजारी समाजाला सध्याचे दोन टक्के आरक्षण कमी पडत आहे. दीड कोटी लोकसंख्या असलेल्या समाजावर हा अन्याय आहे. या पुढच्या काळात वाढीव आरक्षणाबरोबरच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे काम तसेच औरंगाबाद येथील गोपीनाथ मुंडेयांच्या स्मारकाच्या कामाची सुरवात यासाठी सकल वंजारी समाज समन्वय समिती संघर्ष करणार असल्याचे समितीचे मुख्य समन्वयक फुलचंद कराड यांनी आज पुण्यात सांगितले.

वाढीव आरक्षण, प्रवर्ग एकत्रीकरण, पदोन्नती नोकरीतील संधी, धनगर समाजाप्रमाणे वंजारी समाजाला जमातीच्या योजना लागू करण्यासाठी सकल वंजारी समाज समन्वय समिती लढा देईल, असे कराड यांनी सांगितले. वंजारी समाज हा खऱ्या अर्थाने भटका आहे. राज्यात समाजाची संख्या दीड कोटीवर आहे. समाजातील गरीबांची संख्या मोठी आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या समाजातील मुला-मुलींचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. दुसरीकडे केवळ दोन टक्के आरक्षणामुळे सामाजाला न्याया नाकारला जात आहे. या साऱ्याला वाचा फोडण्यासाठी गोपीनाथ गडावर लवकरच मेळावा घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईलल, असे कराड यांनी सांगितले.

या समितीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा समावेश नाही.


राज्यातील वंजारी समाजातील विविध २१ संघटनांची बैठक पुण्याजवळ साळुंब्रे येथे झाली. या बैठकीत सकल वंजारी समाज समनव्य समिती स्थापन करण्यात महाराष्ट्र राज्य ही स्थापन केली. त्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने मुख्य समन्वयपदी फुलचंद कराड यांची घोषणा केली आहे, मुख्य सहसमन्वयपदी बाळासाहेब सानप, निमंत्रक नामदेव सानप, समनव्यक म्हणून राहुल जाधववर, ज्ञानोबा मुंडे, अनिल फड धनराज गुट्टे, लक्ष्मण बुधवंत, राजेंद्र वाघ, पुरुषोत्तम काळे, गणेश खाडे, अजय मुंडे, श्रीकांत चेमटे, अरुण खरमाटे. बाळासाहेब नागरे, शंकरराव बडे, प्रशांत नाईक, डॉ. जायभाये, सुनील कांचंदे, संजय काळबांडे मानसिंगराव माळवे, शंकर उगलमुगले, विक्रम नागरगोजे, रमेश सानप, राजेंद्र राख, मंजुषा दराडे, मनीषा मुंडे , गिरीमा गुट्टे, स्वाती मोराळे, मारूती उगलमुगले, अरण खरमाटे व अशोक लाड-वंजार यांची निवड करण्यात आली आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in