पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचा संघर्ष संपविण्यासाठी 'संग्राम' हेच उत्तर!

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालेले आहे.
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचा संघर्ष संपविण्यासाठी 'संग्राम' हेच उत्तर!
Youth Congress demands to make MLA Sangram Thopte the Speaker of the Assembly

पिंपरी : राज्य विधीमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता.५) सुरु होत आहे. त्यात विधानसभेचे अध्यक्ष परवा निवडले जाणार आहेत. त्यासाठी भोरचे (जि.पुणे) काँग्रेसचे (Congress) तरूण आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांचे नाव चर्चेत आहे. पक्षाचा पुणे जिल्ह्यातील संघर्ष संपविण्यासाठी तरी संग्राम यांना अध्यक्ष करा, अशी मागणी पुणे जिल्हा कॉंग्रेस व त्यातही युवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतून पुढे आली आहे. (Youth Congress demands to make MLA Sangram Thopte the Speaker of the Assembly)

नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झालेले आहे. त्यामुळे अध्यक्ष काँग्रेसचाच होणार आहे. तो कोण हे दिल्लीश्वर ठरवणार आहेत. पण, हे पद भोरला देण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. ते पद जिल्ह्याला का द्यावे, यामागील पटणारे कारणही त्यांनी दिले आहे. त्यामागे कुणा पदाधिकाऱ्याचा स्वार्थ नसून पक्षाचे हित असल्याचे त्यांच्या या मागणीतून दिसून आले आहे. ही भावना पक्षाचे प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदावरून पुणे जिल्ह्यासह राज्यातील राजकारण पुन्हा तापायला लागले आहे. एके काळचा काँग्रेसचा बालेकिल्ला पुणे जिल्हा आता संघर्षाची वाटचाल करीत आहे. पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नाही. पहिले तीन टर्म सत्ता असलेल्या श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेत काँग्रेसचा सध्या एकही नगरसेवक नाही. शहरात एक आमदार नाही. खासदार तर दूरची गोष्ट राहिली. विधानसभा अध्यक्षाच्या रुपात पक्षाला पुन्हा गतवैभवाकडे वाटचाल करण्याची संधी मिळाल्याने हे पद जिल्ह्याला देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. 

थोपटे हे तरुण आमदार २०१४ च्या मोदी लाटेतही पुणे जिल्ह्यातून निवडून आलेले कॉंग्रेसचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे ते या पदासाठी हकदार असल्याचे जयस्वाल यांचे म्हणणे आहे. त्यांना ही संधी दिली तर त्या संधीचे ते सोने नक्कीच करतील यात शंका नाही, असे ते म्हणाले. 

परिणामी राज्यातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी संग्राम थोपटे यांनाच अध्यक्ष पदावर संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अनेक मोठे नेते पक्षाला रामराम करून गेले. अनेक पक्षात असून रावणासारखे आहेत, याकडे लक्ष वेधत अशा कठीण परिस्थितीत पक्षाचे काम करण्याचे आव्हान संग्रामदादा सक्षमपणे सांभाळतील, असा दावा त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in