मुख्यमंत्री आणि सहा मंत्री स्विकारणार का हजारो निवेदने?

यावेळी 16 ते 21 असे एक आठवडाच अधिवेशन चालणार असल्याची माहीती आहे. तरीही हा खर्च कोट्यवधी रुपयांचा असणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना जर मंत्री भेटूच शकणार नसतील, तर हा खर्च वाया नाही का जाणार, असाही प्रश्‍न उपस्थित होतोय. त्यामुळे सोबतच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी होत आहे.
Will CM Uddhav Thakrey Get Time to Meet Vidharbha People During Nagpur Session
Will CM Uddhav Thakrey Get Time to Meet Vidharbha People During Nagpur Session

नागपूर : विदर्भातील लोकांसाठीच हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. येथील लोकांना आपल्या सरकारला भेटायचे असते. हजारो लोकांना आपल्या विविध मागण्यांची निवेदने मंत्र्यांना द्यायची असतात. आता यावेळी सभागृहाचा वेळ सोडून मुख्यमंत्री आणि सहा मंत्री हजारो निवेदने स्विकारणार का, असा प्रश्‍न जनतेकडून विचारला जातोय.

अधिवेशनावर प्रचंड खर्च होतो. सचिवालयांचे अधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी, हजारो वाहने नागपुरात दाखल होतात. त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि इतर व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. अधिवेशनावर 27 हजार रुपये प्रतिमिनीट खर्च होतो, अशी माहीती आहे. यावरुन दोन, तीन आठवडे चालणाऱ्या अधिवेशनात होणाऱ्या खर्चाचा अंदाज येऊ शकतो. 

पण यावेळी 16 ते 21 असे एक आठवडाच अधिवेशन चालणार असल्याची माहीती आहे. तरीही हा खर्च कोट्यवधी रुपयांचा असणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना जर मंत्री भेटूच शकणार नसतील, तर हा खर्च वाया नाही का जाणार, असाही प्रश्‍न उपस्थित होतोय. त्यामुळे सोबतच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचीही मागणी होत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दोघेही विदर्भातीलच नागपुरचे आहेत. विदर्भाचे प्रश्‍न या दोघांकडूनही आजपर्यंत प्रश्‍न कळकळीने मांडले गेलेले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची भूमिका घेतील का, याकडेही जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com