बाराच आमदार निलंबित का? भाजपलाही पडला प्रश्न

भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत.
Why 12 MLAs were suspended BJP also had a question
Why 12 MLAs were suspended BJP also had a question

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत. त्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बाराच आमदार निलंबित का, असा प्रश्न भाजपलाही पडला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Kosyari) यांच्याकडे बारा जणांची यादी अनेक महिन्यांपासून आहे. त्यावरून बरचे राजकारण झालं. त्याला प्रत्यूत्तर म्हणून महाविकास आघाडी सरकारनंही भाजपचे बाराच आमदार निलंबित केल्याची चर्चा आहे. (Why 12 MLAs were suspended BJP also had a question)

गिरीश महाजन, अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, राम सातपुते, जयकुमार रावळ, नारायण कुचे, किर्तीकुमार बांगडिया, पराग आळवणी, हरिष पिंपळे, योगेश सागर या आमदारांना एक वर्षासाठी निलंबित कऱण्यात आले. तसेच त्यांना मुंबई आणि नागपूरच्या विधानभवनाच्या आवारात येण्यास मनाई घातली. त्यानंतर या बारा आमदारांनी राज्यपालांची भेट घेत त्यांना यावर सरकारकडून अहवाल मागवत कारवाई करण्याची मागणी केली. 

राज्यपालांच्या भेटीनंतर बारा आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना आमदार शेलार (Ashish Shelar) म्हणाले, या मुस्कटदाबीला घाबरणार नाही. आकडा सुध्दा 12 काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला दिसतो. एक तास चर्चा करून हा बारा चा आकडा पूर्ण करण्यामागचं कारण काय हे सुध्दा त्यांना स्पष्ट करावं लागेल, अशी मागणी शेलार यांनी केली.  

काही सदस्य पिठासीन अधिकाऱ्यांच्या इथेही गेले नव्हते. काही सदस्य दालनात सुध्दा नव्हते. तरी त्यांना निलंबित केलं गेलं. ही लोकशाही मुल्यांची प्रेतयात्रा ठाकरे सरकारने काढली आहे. राज्यपालांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं असून त्यावर आम्ही समाधानी आहोत, असंही शेलार यांनी सांगितलं.  

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांत जोरदार चकमक झाली. काही सदस्यांनी डायसवरून माईक हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या केबिनमध्ये बैठक झाली. तेथे जाधव यांना शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर बारा जणांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या कारवाईनंतर भाजपनं वॅाकआऊट केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com