मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच भाजप नेत्याचा राजकारण संन्यास अन् खासदारकीचाही राजीनामा

पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले असून, ते खासदारकीचाही राजीनामा देणार आहेत.
west bengal bjp mp babul supriyo says he is quitting politics
west bengal bjp mp babul supriyo says he is quitting politics

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. आता त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले असून, ते खासदारकीचाही राजीनामा देणार आहेत. 

मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुप्रियो हे राजकारणातून संन्यास घेणार, अशी चर्चा सुरू होती. सुप्रियो यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारण संन्यासाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गुडबाय, मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. तृणमूल काँग्रेस, काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यापैकी कुणीही मला बोलावलेले नाही तसेच, मीसुद्धा तेथे जणार नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणात राहण्याची आवश्यकता नाही. मी खासदारकीचा राजीनामा देत आहे. याचबरोबर मला खासदार म्हणून मिळालेले निवासस्थान महिनाभरात रिकामे करेन. 

काही दिवसांपूर्वी सुप्रियो हे तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यांनी ट्विटरवर तृणमूल काँग्रेस आणि मुकुल रॉय यांनी फॉलो करण्यास सुरवात केली होती. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या मुकुल रॉय यांची नुकतीच तृणमूलमध्ये घरवापसी झाली आहे. सुप्रियो हे त्यांना फॉलो करु लागल्यामुळे त्यांच्या तृणमूल प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात होता. यामुळे राज्यातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. 

सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्रिपद होते. मंत्रिमंडळ विस्ताराआधी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले होते. आपल्याला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते, त्यानुसार मी राजीनामा दिला आहे, अशी माहिती त्यांनी सुरूवातीला पोसटमध्ये दिली होती. पण नंतर त्यांनी काही तासांतच बदल केला होता. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ही चूक सुधारत आपल्याला राजीनामा मागितला नाही, आपणच दिल्याचे म्हटले होते.

त्यावेळी पहिल्या फेसबुक पोस्टमध्ये सुप्रियो म्हणाले होते की, होय, जेव्हा धूर असतो तेव्हा कुठे ना कुठे आग लागलेली असते. मला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते. मला मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग न लागू देता मी आज जात आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला राजीनामा द्यावा लागला याचं दु:ख आहे पण इतरांसाठी खूप आनंद होत आहे. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com