पूरग्रस्त भागातील विजबिलांबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा

राज्यातील पूरग्रस्त भागातील वीजबिल वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
nitin raut says no recovery of pending electricity bills of flood affected
nitin raut says no recovery of pending electricity bills of flood affected

सांगली : राज्यातील पूरग्रस्त भागातील (Maharashtra Floods) वीजबिल (Electricity Bill) वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली आहे. पूरग्रस्त भागातील स्थिती भयावह असली तरी संपूर्ण वीजबिल माफ करणे शक्य नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. आधीच्या सरकारने वीज कंपन्यांवर ५६ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे, असा दावाही त्यांनी केला.

ऊर्जामंत्री राऊत म्हणाले की, या वर्षीच्या महापुरात कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत घरे, शेती आणि महावितरणच्या उपकेंद्रांचे मोठे नुकसान झाले. जनतेसाठी वीजेचे महत्त्व मोठे आहे परंतु, वीज ही काही फुकट तयार होत नाही. कोळसा आणि ऑईल विकत घेतल्यानंतर  विजेची निर्मिती होते. कर्मचाऱ्यांचा वेतन वेळेवर द्यावे लागते. आधीच्या सरकारने वीज कंपन्यांवर 56 हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची वेळ आली असून, या कर्जाच्या नोटिसाही आल्या आहेत. 

सध्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह आहे. असे असले तरी संपूर्ण वीजबिल माफ करणे शक्य नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वीजबिल वसुलीला स्थगिती दिली आहे. पूरग्रस्त भागात वीजबिले वाटप आणि सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात येतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

राज्यात कोकणात 22 जुलैला अतिवृष्टी झाली. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टी झाली. सांगली जिल्ह्यात 22 जुलैपासून अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांना पूर आला आहे. सांगलीत पाण्याची पातळी 55 फुटांवर पोचली होती. सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यांना महापुराचा फटका बसला. उपकेंद्रे, ट्रान्सफार्मर, वाहिन्या, खांब आदींचे जिल्ह्यात 35 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महापूर पूर्ण ओसरल्यानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढेल, असे राऊत यांनी सांगितले.  

राज्यातील 170 पूरग्रस्त गावांमधील 9 लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यापैकी 7 लाख 67 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला आहे. पूरग्रस्त गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. वीज पुरवठा खंडित आहे  अशा गावांत तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न महावितरणचे कर्मचारी करीत आहेत. कर्मचारी आणि तांत्रिक अधिकारी रात्रंदिवस झटून हे काम करीत आहेत, असे राऊत यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com