केंद्र आणि राज्याच्या वादात प्रताप सरनाईक बळीचा बकरा!

सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावत व पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर सडकून टीका केली होती.
Victim in the dispute between the state and the center says Pratap Sarnaik
Victim in the dispute between the state and the center says Pratap Sarnaik

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांची ईडीची चौकशी सुरू आहे. यावर माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी केंद्र व राज्याच्या वादात बळीचा बकरा बनल्याचं वक्तव्य केलं आहे. केंद्राला असं वाटलं की प्रताप सरनाईक सगळ्यांच्या मागे लागलाय, असंही ते म्हणाले आहेत. (Victim in the dispute between the state and the center says Pratap Sarnaik)

सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना राणावत व पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू झाली. याविषयी माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले, कंगना राणावत, अर्णव गोस्वामीवर मी टीका केली होती. त्याचा दोष माझ्या मुलांवर किंवा माझ्या कुटूंबावर येऊ नये ही माझी भूमिका आहे. माझ्यामुळं माझ्या कुटूंबाला कसलाही त्रास होऊ नये, हा माझा प्रयत्न आहे.

एकनाथ खडसे यांच्यावरही ईडीची कारवाई सुरू आहे. याविषयी बोलताना सरनाईक म्हणाले, मी स्वत:च अडचणीत असताना मी या गोष्टींवर कसं बोलणार. माझी लढाई मी लढतोय. मला कुणीही त्रास दिलेला नाही. त्यांची कारवाई ते करत आहेत. त्यांना सहकार्य करणं, हे माझे कर्तव्य आहे. 

दहीहंडी ऐवजी आरोग्य उत्सव  साजरा करणार 

कोरोना संसर्गाच्या कारणास्तव राज्य सरकारनं यंदाही दहीहंडी उत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. पण भाजपच्या काही नेत्यांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा इशारा दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी प्रसिद्ध आहे. पण त्यांनी यंदा दहीहंडीऐवजी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडी उत्सव रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली आहे. काही आयोजक हे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी उत्सव करणार आहे. पण त्यांनी गोविंदाच्या जीवाशी खेळू नये, असं आवाहनही सरनाईक यांनी यावेळी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com