काँग्रेसच्या नियुक्त्यांवर दुसऱ्याच दिवशी नाराजीनाट्याला सुरूवात

कार्यकारणीत महिलांना पुरेशी संधी न दिल्यानेही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Dissatisfaction with the Congress appointments started
Dissatisfaction with the Congress appointments started

पिंपरी : काँग्रेसच्या २२०  जणांचा समावेश असलेल्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा गुरूवारी रात्री करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या नियुक्त्यांवर नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. या कार्यकारिणीत पिंपरी-चिंचवडमधील फक्त एकाच नेत्याला स्थान मिळाले आहे. सध्या १२८ सदस्य संख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्षाचा एकही सदस्य नसून शहरात पक्षाचे अस्तित्व पणाला लागले आहे. असे असूनही पुन्हा उभारी घेण्याकरिता प्रदेशमध्ये पुरेशी संधी मिळायला हवी होती, अशी शहर काँग्रेसमधील सुप्त भावना आहे. (Dissatisfaction with the Congress appointments started)

कार्यकारणीत महिलांना पुरेशी संधी न दिल्यानेही महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहराला या कार्यकारिणीत पुरेशी संधी तर मिळाली नाहीच, पण महिलांना घेण्याची मागणी करूनही ती डावलण्यात आल्याने माजी महिला प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. गतवेळी कार्यकारिणीत दोघे होते. मग,आता का नाही, अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळे शहराला न्याय मिळाला नसल्याची नाराजीची प्रतिक्रिया त्यांनी 'सरकारनामा'ला दिली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार घेतल्यानंतर आपली कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी तब्बल चार महिन्याचा वेळ घेतला. त्यात १८ उपाध्यक्ष, ६५ सरचिटणीस आणि तब्बल १०४ चिटणीस आहेत. त्यांच्या अगोदरचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे जुन्याच म्हणजे अशोक चव्हाणांच्या कार्यकारिणीला घेऊनच काम पाहत होते. त्यात पिंपरी-चिंचवडमधील पृथ्वीराज साठे आणि भाऊसाहेब भोईर होते. साठे हे सरचिटणीस, तर भोईर हे चिटणीस होते. यावेळी ही संख्या निम्याने घटून फक्त एकवर आली आहे. त्यातही शहराचे सरचिटणीसपद काढून फक्त चिटणीसपदावर बोळवण करण्यात आली आहे. त्यापदी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन साठे यांची नियुक्ती झाली आहे. 

गेले दोन टर्म शहराध्यक्ष व दोन तप पक्षात असलेल्या सचिन साठे यांच्यासारख्या ज्येष्ठाला खरं तर सरचिटणीससारखं मोठं पद मिळायला हवं होतं, अशी नाराजीची चर्चा शहर काँग्रेसमध्ये ऐकायला मिळाली. माणिकराव ठाकरे यांच्या कार्यकारिणीत ते चिटणीस होते. पुन्हा याच पदावर ते आले आहेत. तरीही समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या नियुक्तीवर 'सरकारनामा'शी बोलताना दिली. 

काँग्रेसमध्ये एक पद, एक व्यक्ती हे तत्व पाळले जाते. मात्र, प्रदेश चिटणीसपदी निवड झालेल्या सचिन साठे यांच्यावर तूर्त दुहेरी जबाबदारी आहे. ते शहराध्यक्षही आहेत. विधानपरिषेदवर संधी न दिल्याने गेल्यावर्षी ११ नोव्हेंबरला त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मात्र, साडेआठ महिन्यानंतरही तो मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवीन अध्यक्ष शहराला मिळालेला नाही. दुसरीकडे साठे या पदावर राहण्यास तयार नाहीत. तर, एकमत होत नसल्याने नवीन अध्यक्षांची निवड अद्याप झालेली आहे. दुसरीकडे पालिकेची निवडणूक सहा महिन्यावर आल्याने याबाबत काय तो निर्णय घेण्यात यावा, अशी शहरातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षपदासाठी नव्याने लगेचच हालचाली सुरु होण्याची शक्यता असल्याचे शुक्रवारी पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com