us president donald trump will not attend joe biden inauguration
us president donald trump will not attend joe biden inauguration

ट्रम्प म्हणाले, मी येणार नाय अन् बायडन म्हणाले, बरं झालं...

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनीकॅपिटॉलवर हल्ला केला होता. यावरुन मोठा गदारोळ सुरू असून, ट्रम्प हे चांगलेच अडचणीत आले आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांना कॅपिटॉलवर हल्ला केला होता. यावरुन मोठा गदारोळ सुरू असून, ट्रम्प हे चांगलेच अडचणीत आले आहेत. अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीला मी जाणार नाही,  अशी भूमिका ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. यावर बायडन यांनी बरे झाले ते येत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

बायडन यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांची नावे पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. या वेळी बायडन यांना ट्रम्प हे शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बायडन म्हणाले की, ते येणार नाहीत, ही तर चांगली गोष्ट आहे. आमच्यात दोघांमध्ये फार कमी मुद्द्यांवर एकमत झाले असून, यातील हा एक मुद्दा आहे. माझ्या अपेक्षेपेक्षाही ते अधिक विचित्र आहेत. त्यांनी संपूर्ण देशालाच लाजेने मान खाली घालायला लावली आहे.

कॅपिटॉलवरील हल्ल्यावरुन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅले यांनी त्यांच्याच पक्षाचे असलेल्या ट्रम्प यांना सुनावले आहे. हॅले म्हणाल्या की, डोनाल्ड ट्रम्प यांनी नेहमीच योग्य वक्तव्य केले असे नाही. त्यांनी अनेक वेळा चुकीचे शब्द वापरले आहेत. कालही त्यांनी तसेच केले. केवळ शब्दच नाही, तर त्यांच्या अनेक कृत्यांबद्दल इतिहास त्यांना प्रश्‍न विचारेल. मतभेद असला तर आपण बोलू शकतो, पण अमेरिकी नागरिकांना एकमेकांविरोधात भडकावणे थांबवायला हवे. 

दरम्यान, भविष्यात हिंसाचाराला चिथावणी मिळण्याचा धोका असल्याने ट्विटरने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. कॅपिटॉलवरील हिंसाचार भडकण्यापूर्वी ट्रम्प यांनी ट्विटरवरून व्हीडिओ संदेशाद्वारे समर्थकांनी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांचे ट्विटरवर ८ कोटी ८७ लाख फॉलोअर असून, जगभरातील सर्वाधिक फॉलोअर असलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षाही त्यांचे फॉलोअर अधिक आहेत. 

नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी होत आहे. त्या वेळीही ट्रम्प समर्थकांकडून मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यावेळी ट्रम्प हे पुन्हा एकदा अशी चिथावणी देण्याची शक्यता असल्याने संभाव्य हिंसा टाळण्यासाठी ट्विटरने त्यांचे अकाऊंटच बंद केले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवरून गेल्या काही दिवसांत केले गेलेले ट्विट आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादांचा आढावा घेतल्यानंतर भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी आम्ही हे अकाऊंट कायमस्वरुपी बंद करीत आहोत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in