शिवसेना भवनासमोरचा राडा अन् दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांच्या पाठीवर थाप - uddhav thackeray meets shivsaniks from wadala and mahim | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

शिवसेना भवनासमोरचा राडा अन् दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांच्या पाठीवर थाप

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जून 2021

शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाला होता. यामुळे शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत.   

मुंबई : शिवसेना (Shivsena) भवनासमोर भाजप (BJP) कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये काल राडा झाला होता. कालच्या प्रकारानंतर शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडाळा विभागातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. 

राम मंदिर जमीन गैरव्यवहारावर शिवसेनेचे  मुखपत्र ‘सामना’मध्ये  बोट ठेवण्यात आल्याने काल (ता.16) भाजपच्या मुंबई युवा मोर्चाचे कार्यकर्ते दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी काल गेले होते. या आंदोलनाची कुणकुण लागताच शिवसेनेचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमल्याने बाचाबाचीला सुरुवात होऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर, माहीम आणि वडाळा विभागातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो ट्विट शिवसेनेने केले आहेत. यात शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख एवढाच उल्लेख आहे. शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांनी चोप दिल्यानंतर आज झालेली ही भेट वेगळी मानली जात आहे. शिवसैनिकांच्या पाठीवर थाप मारुन एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी कालच्या कृत्याचे समर्थन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

आले अंगावर की घ्या शिंगावर, या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शिवसैनिकांनी कृती केली होती. उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबाशकीची थाप मारत हीच शिकवण पुढे नेण्याचे ठरवल्याचे दिसते, अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, कालच्या घटनेनंतर आमदार सदा सरवणकर यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. संयम ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे सरवरणकर यांनी या भेटीनंतर सांगितले. 

हेही वाचा : 54 महिन्यांत 9 बदल्यांमुळे वैतागलेला आयएएस अधिकारी 

भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंदर तिवाना यांच्यासह कार्यकर्ते काल मोठ्या संख्येने फटकार मोर्चासाठी शिवसेना भवनसमोर जमले होते. शिवसेनेविरोधात घोषणा देत असतानाच तेथे शिवसेनेचे आमदार सदा सरणवकर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पोहोचले. घोषणाबाजी सुरू असतानाच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. धक्काबुक्की, हाणामारीमुळे या परिसरातील वातावरण तंग झाले होते.

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यास सुरुवात करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला होता. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवसेना भवनासमोर हा प्रकार सुरू असताना परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. संध्याकाळनंतर या परिसरातील गर्दी कमी झाली असली, तरी वातावरण तंग होते. तसेच या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख