54 महिन्यांत 9 बदल्यांमुळे वैतागलेला आयएएस अधिकारी अन् प्रधान सचिवांचे संभाषण व्हायरल

आयएएस अधिकारी आणि राज्याच्याप्रधान सचिव यांच्यातीलसंभाषणाचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
IAS officer gets notice for sharing his conversation over transfer
IAS officer gets notice for sharing his conversation over transfer

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) आयएएस (IAS) अधिकारी आणि राज्याच्या प्रधान सचिव यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकेश कुमार जांगीड (Lokesh Kumar Jangid) असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी सरकारने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

जांगीड हे बरवानी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. त्यांची 31 मे रोजी राज्य शिक्षा केंद्रात बदली झाली. ही त्यांची 54 महिन्यांत नववी बदली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव दिप्ती गौर मुखर्जी यांनी फोन करुन जांगीड यांनी त्यांच्या बदलीचे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग जांगीड यांनी सोशल मीडियावर टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

या विषयी बोलताना जांगीड म्हणाले की, हे संभाषण सुमारे 30 सेंकदांचे होते. हे माझ्या बदलीसंदर्भात होते. मी ते माझ्या चार आयएएस सहकाऱ्यांशी शेअर केले होते. माझ्या बदलीचा आदेश सामान्य प्रशासनाकडून निघाल्यानंतर आणि तो संकेतस्थळावर अपडेट झाल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांना पर्सनल चॅटवर हे संभाषण पाठवले होते. त्यांनी माझ्या अचानक झालेल्या बदलीचे कारण विचारल्याने त्यांना हे संभाषण पाठवले होते. इतर कोणत्याही ठिकाणी मी ते शेअर केलेले नाही. 

मी कोणताही शिस्तभंग केलेला नाही. कारण ती माहिती गोपनीय तसेच खासगी स्वरुपाची नव्हती. याचबरोबर प्रधान सचिव मुखर्जी यांच्याबद्दलचीही ती खासगी माहिती नव्हती. माहिती अधिकार कायद्यांतर्गतही सार्वजनिक स्वरुपाची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी स्वत:हून जाहीर करावी असे म्हटले आहे, असेही जांगीड यांनी स्पष्ट केले. 

याबाबत बोलताना प्रधान सचिव दिप्ती गौर मुखर्जी म्हणाल्या की, या प्रकरणी जांगीड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यावर त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या बदलीबाबत फोन करुन कळवणे एवढेच माझे काम होते. परंतु, त्यांनी माझ्यासोबतचे संभाषण टॅप केले आणि माझ्या खासगीपणावर गदा आणली. सरकारी अधिकाऱ्याला असे करणे शोभत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in