उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पक्षपाती, त्यांना हटवा! आमदाराची सरन्यायाधीशांकडे तक्रार - Trinamool Congress MLA demands removal of Chief Justice | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पक्षपाती, त्यांना हटवा! आमदाराची सरन्यायाधीशांकडे तक्रार

वृत्तसंस्था
सोमवार, 28 जून 2021

न्यायमूर्ती बिंदल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल (West Bengal) उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांचे छायाचित्र ट्विट करून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी खोचक टिपण्णी केली होती. आता तृणमूलच्या आमदारांनी मुख्य न्यायमूर्तींविरोधातच आवाज उठवला आहे. हे आमदार पश्चिम बंगालच्या बार कौन्सिलचे अध्यक्षही असून त्यांनी थेट सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. (Trinamool Congress MLA demands removal of Chief Justice)

कोलकता उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल (Chief Justice Rajesh Bindal) यांची तक्रार करण्यात आली आहे. तृणमूलचे आमदार व बार कौन्सिलचे अध्यक्ष असलेले अशोक कुमार देव (Ashok Kumar Deb) यांनी न्यायमूर्ती बिंदल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. 'न्यायमूर्ती बिंदल हे पक्षपाती, अयोग्य असून निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत वारंवार हस्तक्षेप करत आहेत, असं देव यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या सहा पानी पत्रामध्ये लिहिलं आहे. 

हेही वाचा : पतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकलून दिलं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय

पत्रामध्ये नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. न्यायमूर्ती बिंदल यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेली अंतरिम जामीनाचा आदेश स्थगित केला. संबंधितांना आपली बाजू मांडण्याची संधी न देता राजकीय हेतूने स्थगिती दिली. न्यायमूर्ती बिंदल हे राज्यपालांना भेटल्याची छायाचित्र सोशल मीडियावरप्रसिध्द झाली आहेत. ते भाजपचे असल्याचे मत सोशल मीडियातील पोस्टवरून तयार होते, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

जम्मू व काश्मीर बार असोसिएशननेही न्यायमूर्ती बिंदल यांच्या वागणूकीवमुळे त्याच्या न्यायालयावर बहिष्कार टाकला होता, याचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मधील निकालाविरोधात दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती कौशिक चंदा यांच्या न्यायालयासमोर सुनावणीस दिल्याचेही पत्रात म्हटले आहे. न्यायमूर्ती चंदा यांचे संबंध भाजपशी असल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी हे प्रकरण त्यांच्याकडे सुनावणीस विरोध केला आहे. 

दरम्यान, देव यांच्या या पत्रावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी न्यायमूर्ती बिंदल यांना हटविण्याचा प्रयत्न केवळ राजकीय उद्देशाने केला जात असल्याचं म्हटले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून देव यांचा वापर केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख