तळीयेत भावनांचा फुटला बांध; एकाचवेळी 84 जणांचे सामूहिक उत्तरकार्य

जो डोंगर वर्षानुवर्षे सावलीसारखा उभा राहिला त्यात डोंगरानं घात केला. एकाचवेळी 84 जणांना हिरावून नेलं.
Tributes were paid to 84 people in Taliye village
Tributes were paid to 84 people in Taliye village

महाड : महाड तालुक्यातील तळीये गावासाठी 22 जुलैची सायंकाळ भयानक संकट घेऊन आली. अख्खं गाव दरडीखाली गाडलं गेलं. जो डोंगर वर्षानुवर्षे सावलीसारखा उभा राहिला त्यात डोंगरानं घात केला. एकाचवेळी 84 जणांना हिरावून नेलं. दरडीखालील 53 जणांचे मृतदेह सापडले पण 31 जणांना शोधण्यात अखेरपर्यंत यश आलं नाही. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या या गावात मंगळवारी (ता. 3) एकाचवेळी 84 जणांचे सामूहिक उत्तरकार्य करण्यात आले अन् तळीयेत भावनांचा बांध फुटला. (Tributes were paid to 84 people in Taliye village)

जुलै महिन्यात कोकणासह महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीनं अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. नद्यांना आलेल्या पुरानं अनेक गावं पाण्याखाली गेली होती. पण तळीये गावातील घटनेनं हृदय पिळवटून टाकलं. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याची घटनेच्या खूणा अजूनही दिसतात. तोच ही घटना घडल्यानंत अवघा महाराष्ट्र हादरला. 22 जुलै रोजी तळीये गावातील सुमारे 35 गावांवर दरड कोसळली. 

दरडीखाली अनेकजण गाडले गेले. काही तासांनी बचावकार्य सुरू झाल्यानंतर एक-एक मृतदेह हाती लागू लागला. काही जणांना वाचवण्यात यश आलं. पण मृतांचा आकडा वाढतच गेला. सुरूवातीला एकूण 84 जण बेपत्ता असल्याचा आकडा समोर आला. बचावकार्य थांबलं तेव्हा 53 जणांचे मृतदेह सापडले होते. तर 31 जणांचा तपासच लागला नाही. अखेर त्यांना प्रशासनाने मृत घोषित केले. अनेकांना आपल्या नातेवाईकांचा अंतविधीही करता आला नाही.

एकाचवेळी उत्तरकार्य

मृत 53 व बेपत्ता असलेल्या 31 जणांचे सामूहिक उत्तरकार्य एकाचवेळी करण्यात आले. त्यासाठी सर्व मृतांच्या तसबिरी एका मांडवात रांगेत फुलांनी सजवून ठेवल्या होत्या. गावातील लहान-थोरांसह प्रत्येकानं आदरांजली वाहिली. मृतांमध्ये लहान मुलांसह तरुण अन् ज्येष्ठांचाही समावेश आहे. त्यामुळं गावावर शोककळा पसरली आहे. 

उत्तरकार्यावेळी महिलावर्गाचा आक्रोश सुरू होता. तसेच गावातील बहूतेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. एकीकडे ‘आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा,’ असे भजन मंडपात चाललेले असताना दुसरीकडे भावनांचा बांध फुटला होता. हृदय पिळवटून टाकणाऱे हे दृश्य होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com