...अन् तिच्यासाठी अर्धा तास विधानसभा थांबली!

सध्या आसाम विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.
Tokyo Olympics Assam Assembly was adjourned for thirty minutes
Tokyo Olympics Assam Assembly was adjourned for thirty minutes

गुवाहाटी : टोकियो ऑलिम्पिकमध्ये जगज्जेती बॉक्सर मेरी कोमच्या पराभवानंतर बॉक्सर लवलिना बोरगोंहिम हिने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला अन् पदक निश्चित झालं. तिच्या खेळाचं भारतभर कौतूक करण्यात आलं. आज तिची सेमी फायनलचा सामना झाला. संपूर्ण देशाचं लक्ष तिच्या खेळाकडं लागलं होतं. पण आसाममध्ये चक्क विधानसभेचं कामकाज थांबवण्यात आलं, तेही अर्धा तास. (Tokyo Olympics Assam Assembly was adjourned for thirty minutes)

लवलिना ही मुळची आसामची आहे. तिचा आज सकाळी तैपईच्या खेळाडूसोबत सेमी फायनलचा सामना होता. हा सामना पाहण्यासाठी अनेकांच्या नजरा टीव्हीवर खिळल्या होत्या. पण आसामवासियांनी त्यासाठी जोरदार तयारी केली होती. त्यात आसाम विधानसभाही मागे नव्हती. तिचा सामना पाहण्यासाठी विधानसभेत खास व्यवस्था करण्यात आली होती. 

सध्या आसाम विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पण लवलिनाचा सामना पाहण्यासाठी विधानसभेचे कामकाज 30 मिनिटे स्थगित ठेवण्यात आले. या सामन्या लवलिनाचा पराभव झाला. पण ती कांस्यपदकाची मानकरी ठरली असल्याने देशाला आणखी एक पदक मिळालं आहे. त्यामुळं पराभवानंतरही आसाम विधानसभेत तिच्या खेळाचं कौतुक करण्यात आलं. ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर पदक मिळवणारी ती केवळ तिसरीच बॉक्सर ठरली आहे.  

या सामन्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी लवलिना हिचे अभिनंदन केलं आहे. तिचे नाव आसामच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिलं जाईल, असे गौरवोद्गार यांनी काढले. ट्विटरवर सरमा म्हणाले, 'आसामची मुलगी लवलिनाचे अभिनंदन. तिने कांस्य पदक घरी आणलं आहे. संपूर्ण देशाला तुझ्या अवर्णनीय कामगिरीचा अभिमान आहे.'

दरम्यान, एखाद्या सामन्यासाठी विधीमंडळाचे कामकाज थांबवण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. गोंधळ किंवा अपरिहार्य कारणांमुळंच हे कामकाज स्थगित केलं जातं. पण लवलिनाचा सामना पाहण्यासाठी आसाम विधानसभचे कामकाज थांबवण्यात आलं होतं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com