अमित शहा संसदेत आले तर मुंडन करीन!

विरोधकांनी संसदेत पेगॅसस प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री मित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी केली आहे.
If Amit Shah comes to parliament i will shave may head says Derek Obrien
If Amit Shah comes to parliament i will shave may head says Derek Obrien

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडलं आहे. संसद अधिवेशनात विरोधकांनी चर्चेची मागणी करत सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच दिल्लीतील बलात्काराच्या घटनेवरूनही विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यावर चर्चेची मागणी करत एका खासदाराने गृहमंभी अमित शहा यांना संसदेत येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलं आहे. अमित शहा यांनी आज (ता. 4) संसदेत येऊन उत्तर दिल्यास मुंडन करू, असं हा खासदार म्हणाला आहे. (If Amit Shah comes to parliament i will shave may head says Derek Obrien)

विरोधकांनी संसदेत पेगॅसस प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री मित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणीही लावून धरली आहे. पण सरकारकडून ही मागणी मान्य होत नसल्याने विरोधकांकडून गोंधळ घातला जात आहे. त्यामुळं संसदेचे कामकाजात अडथळे येत आहेत. या स्थितीतच सरकारकडून कायदे मंजूर केले जात आहेत. 

यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी अधिवेशनाच्या काळात मंजूर कायद्यांची यादीच टाकली आहे. हे ट्विट करताना त्यांनी 'कायदे मंजूर करतायं की पापडी चाट बनवतायं' असं विधान केलं होतं. आता त्यांनी थेट अमित शहा यांना आव्हान दिलं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी दिल्लीतील बलात्कार प्रकरणावर अमित शहा यांनी संसदेत बोलावे, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. पण पेगॅसस प्रकरणामुळं ते घाबरले असल्याने संसदेत येणार नाही. ते आज (ता. 4) संसदेत आले तर मी मुंडन करेन, असंही ओब्रायन म्हणाले आहेत. 

दरम्यान, ओब्रायन यांनी दोन दिवसांपूर्वी पापडी चाट बाबत केलेल्या ट्विटवरून भाजप नेत्यांनी त्यांना धारेवर धरले होते. मंगळवारी भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने संसदेचे कामकाज बंद पाडले जात आहे. हा संसद, लोकशाही आणि लोकांचा अपमान आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या कृतीमुळे संसदेचा सातत्याने अवमान होत आहे. मंत्र्याच्या हातातून कागद हिसकावून घेत ते फाडत हवेत भिरकवण्याचा प्रकार संसदेत घडला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर ओब्रायन यांनी दिल्लीत लोकसभेतील खासदार ककोली घोष दस्तगीर यांच्यासोबत पापडी चाटचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाही आमंत्रण दिलं होतं. माध्यमांशी बोलताना ओब्रायन म्हणाले, मी लोकांच्या भाषेत बोलतो. लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी मी या लोकप्रिय पदार्थाचा उल्लेख केला आहे. पापडी चाट ऐवजी ढोकळ्याचा उल्लेख केला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आनंदी झाले असते, असा टोलाही ओब्रायन यांनी लगावला.

ओब्रायन यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटमध्ये संसदेत मंजूर कायद्यांची माहिती दिली आहे. पहिल्या दहा दिवसांमध्ये मोदी व शहा यांनी 12 कायद्यांना मंजूरी दिली आहे. एका कायद्यासाठी केवळ सात मिनिटे या वेगाने हे कायदे पारित झाले आहे, असं म्हणत ओब्रायन यांनी पापडी चाट चा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com