Total 19 FIRs registered against BJPs Jan Ashirwad Yatra
Total 19 FIRs registered against BJPs Jan Ashirwad Yatra

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला दणका; एक-दोन नव्हे तब्बल 19 गुन्हे दाखल 

राणेंची यात्रा गुरूवारपासून मुंबईतून सुरू झाली आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईत गुरुवार (१९ ऑगस्ट) पासून सुरु झाली आहे. या यात्रेवर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. कोरोनाची तिसरा लाट येण्याचा धोका असताना ही यात्रा काढण्यात आल्याचा ठपका ठेवला जात आहे. हेच कारण देत मुंबई पोलिसांनी या यात्रेवर एक-दोन नव्हे तर तब्बल 19 गुन्हे दाखल केले आहेत. (Total 19 FIRs registered against BJPs Jan Ashirwad Yatra)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने स्थान मिळालेल्या सर्व मंत्र्यांना देशभरात जनआशीर्वाद यात्रा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राणेंची यात्रा गुरूवारपासून मुंबईतून सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट सुरू आहे. ही लाट काहीशी आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

त्यातच राणे यांच्या यात्रेला मोठी गर्दी होत असून कोरोना नियमांचे पालन केले जात नाही, असा ठपका ठेवत मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत तब्बल 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, तिसऱ्या लाटेचा धोका असताना प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करायला हवे. शिवसेना किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली तरी त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाईल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यानंतर सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, सात हजार गुन्हे दाखल करा. ज्याच्यावर गुन्हे दाखल झाले, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. गुन्हे दाखल करणाऱ्यांना मला सांगायचे आहे, की केंद्रात आमची सत्ता आहे, असा सुचक इशारा राणे यांनी दिला. मुंबईत सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. आम्ही जागतीक कीर्तीचे शहर करु. मुंबई महापालिकेत आमची सत्ता येईल. कोरोना हाताळण्यामध्ये राज्य सरकार कमी पडले. शिवसेनेचे लोक कसे वागतात हे मी जवळून पाहिले आहे. वेळ आल्यावर सगळे उघडे करीन, उघडे करण्याची वेळ आणून नये, असा इशारा राणे यांनी दिला. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणले होते की, नारायण राणे यांना ओळखत नाही. त्यावर राणे म्हणाले, मी त्यांना जवळ बोलवून ओळक करुन देईल. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आज विरोधी पक्षांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित असणार आहेत त्या विषयी विचारले असता राणे म्हणाले, मी शिवसेनेत ३९ वर्ष काढली. बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी हिंदूत्वाची होती. त्यांनी जे केले ते हिंदूत्वासाठी आणि मराठी माणसासाठी केले. मात्र, हे सत्तेसाठी लाचार झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com