पंडित नेहरू हे आदर्श नेते; गडकरींचा भाजपला घरचा आहेर

वाजपेयी यांच्या कामाचा वारसा आमच्यासाठी प्रोत्साहनाचा स्त्रोत आहे.
Nitin Gadkari  .jpg
Nitin Gadkari .jpg

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष अशा सर्वांनाच आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी म्हटेल आहे. दिल्लीत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले. (Nehru, Vajpayee is the ideal leader in democracy)   

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी कृषी कायदे, इंधन दरवाढ आणि पेगॅसस वरुन उपयोग करुन पाळत ठेवल्याच्या आरोपावरुन गोंधळ घातला. यावर गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर गडकरी म्हणाले, ''पंडीत जवाहरलाल नेहरु व अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतील आदर्श नेते होते. आम्ही आमच्या लोकशाही मर्यादांचे पालन करु असे हे दोन्ही नेते सांगत. वाजपेयी यांच्या कामाचा वारसा आमच्यासाठी प्रोत्साहनाचा स्त्रोत आहे. नेहरु यांचेही भारतीय लोकशाहीत मोठे योगदान आहे.''  

गडकरी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत एक आठवणही सांगितली. गडकरी म्हणले, ''मी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेता होतो. तेव्हा आम्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अटलजी मुंबईत आले होते. त्यांना ही गोष्ट्र समजल्यानंतर ते म्हणाले, लोकशाहीत वागण्याची ही पद्धत नाही. लोकांपर्यंत योग्य संदेश देणे महत्त्वाचे आहे.''

आज जे सत्तेत आहेत ते विरोधी पक्षात जातील आणि विरोधी पक्षात आहेत ते उद्या सत्तेत येतील. आमच्या भूमिका बदलत राहतात. मात्र, सर्व पक्षांनी आत्मचिंतन करण्याती गरज आहे, असे गडकरी म्हणाले. प्रत्येकाने मर्यादेचे पालन केले पाहिजे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीचे दोन चाक आहेत. मजबूत विरोधी पक्ष लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे, असे गडकरी यांनी सांगितले. काँग्रेस मजबूत विरोधी पक्ष बनला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.   

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com