Eknath Khadse News गटनेतेपदाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच खडसेंवर आत्मचिंतनाची वेळ!

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विधान परिषदेतील गटनेतेपदाची जबाबदारी शुक्रवारी (ता. १० मार्च) सोपवली
Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर विधान परिषदेतील गटनेतेपदाची जबाबदारी शुक्रवारी (ता. १० मार्च) सोपवली. त्या निवडीचा जल्लोष करण्यापूर्वीच अवघ्या बारा तासांतच खडसेंच्या पदरी पराभव पडला, त्यामुळे गटनेतेपदाचा आनंद साजरा करावा की पराभवाचा दुःख व्यक्त करत बसावे, असा प्रश्न खुद्द खडसे आणि त्यांच्या समर्थकांना पडला असू शकतो. (Time for self-reflection on Khadse before celebrating the happiness of the group leader)

भाजपमध्ये होणारी गळचेपी सहन न झाल्याने वरिष्ठ नेते खडसे यांनी पक्षाला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेतील आमदारकी बहाल केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या मंत्रीपदाची चर्चाही रंगली हेाती. मात्र, ती चर्चा वास्तवात येण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी ते सरकार उलथवून टाकले आणि खडसे यांचे पुन्हा मंत्री होण्याचे स्वप्नही भंग पावले.

Eknath Khadse
Manish Sisodia News : जेलमधून मनीष सिसोदिया यांचा केंद्राला इशारा : ‘साहेब मला तुरुंगात टाकून....’

दुसरीकडे, भाजपकडून खडसे यांच्यापुढील अडचणी वाढविण्याचा प्रयत्न होत असताना राष्ट्रवादीने मात्र त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत त्यांच्याकडे विधान परिषदेतील गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. कालच विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या गटनेतेपदाची घोषणा केली होती.

Eknath Khadse
Jalgaon District Bank : संजय पवारांना उमेदवारी द्या, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे संचालक खडसेंना चार दिवसांपासून सांगत होते : गुलाबरावांचा गौप्यस्फोट

खडसे यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवून बारा तास उलटण्यापूर्वीच भाजप आणि गुलाबराव पाटील यांनी एकत्र येत खडसेंच्या आनंदावर विरजण टाकले आहे. कारण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यात त्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसची साथ होती. मात्र, राष्ट्रवादीतच बंडखोरी झाली आणि भाजपने शिंदे गटाच्या माध्यमातून खडसेंचा गेम केला.

Eknath Khadse
Jalgaon District Bank : शिवसेना, काँग्रेसने आमचा विश्वासघात केला : जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवानंतर खडसेंचा आरोप

अगोदर जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघातून, तर आता जिल्हा बॅंकेतून खडसेंची सत्ता हद्दपार केली आहे. बहुमत हाती असूनही आपले डाव फसल्याने खडसेंच्या हातातून बॅंके गेली आहे. वास्तविक राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरी लक्षात घेऊन खडसेंनी संजय पवार यांच्या गळ्यात उमेदवारीचा माळ घातली असती तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती, त्यामुळे गटनेतेपदाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच खडसेंवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com