taliban cofounder mullah abdul ghani returns to afghanistan
taliban cofounder mullah abdul ghani returns to afghanistan

तब्बल 20 वर्षांनी अफगाणिस्तानमध्ये मुल्ला बरादरने टाकलं विजयी पाऊल

अफगाणिस्तानवर अखेर तालिबानने ताबा मिळवला आहे. आता या देशाचा पुढील अध्यक्ष म्हणून तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर विराजमान होण्याची शक्यता आहे.

काबूल : अफगाणिस्तानवर (Afghanistan) अखेर तालिबानने (Taliban) ताबा मिळवला आहे. आता या देशाचा पुढील अध्यक्ष म्हणून तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Abdul Ghani Baradar) विराजमान होण्याची शक्यता आहे. त्याला अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानने 2018 मध्येच तुरूंगातून सोडून दिलं होतं. त्यानंतर तीन वर्षांतच मुल्ला बरादरने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. त्याचे आज तब्बल 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये आगमन झाले. त्याआधी तो दोहा येथे होता. तो अनेक महिने तेथे अमेरिका आणि अफगाण सरकारशी शांतता चर्चा करीत होता. 

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांनी पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. काबूलमधील राष्ट्रपती भवनात पोहचत तालिबानने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आता तालिबानचा नेता मुल्ला बरादरवर संपूर्ण जगाचं लक्ष केंद्रित झालं आहे. अफगाणिस्तानचं भवितव्य त्याच्या हातात जाणार आहे. बरादर याचा जन्म उजगान प्रांतात 1968 मध्ये झाला आहे. तो तालिबानचा सहसंस्थापक आहे. 

हैबतुल्लाह अखंदजादानंतर तालिबानमध्ये बरादर हा दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. 2010 मध्ये त्याला पाकिस्तानातील कराचीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये अमेरिकेच्या सांगण्यावरून त्याची सुटका करण्यात आली. सध्या बरादर हा तालिबानचा सर्वमान्य नेता व राजकीय प्रमुख आहे. त्याने 1980 मध्ये सोवियत सेनेविरोधात अफगाण मुजाहिद्दीनच्या लढ्यात सहभाग घेतला होता.

1992 मध्ये रशिया बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानात अंतर्गत कलह निर्माण झाला. त्यावेळी बरादरने आपले पुर्वीचे कमांडर आणि नातेवाईक मोहम्मद उमर याच्यासोबत कंदहारमध्ये एक मदरसा सुरू केला. तर या दोघांनीच 1994 मध्ये तालिबानची स्थापना केली. पाकिस्तानमधील आयएसआयच्या समर्थनानंतर तालिबानने 1996 मध्ये एक-एक प्रांत ताब्यात घेत अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवली. बरादर हा आपल्या राजकीय डावपेचांसाठी ओळखला जातो. 

त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुढील पाच वर्ष तालिबानची सत्ता राहिली. यादरम्यान बरादरकडे अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. तो उप संरक्षण मंत्री होता. तसेच अनेक प्रशासकीय पदांवर होता. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आक्रमणानंतर तालिबानची सत्ता गेली. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा एकदा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणवर कब्जा केल्यानंतर बरादर म्हणाला की, 'एका आठवड्यातच सर्व बड्या शहरांवर कब्जा केला आहे. आमच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगाने हे झाले. पण आमच्यासोबत खुदा होता.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com