अमेरिकेने 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये ओतलेले तब्बल 83 अब्ज डॉलर पाण्यात

अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा तालिबानची सत्ता आली आहे. यामुळे अमेरिकेने 20 वर्षे खर्च केलेला सर्व पैसा पाण्यात गेला आहे.
usa looses 83 billion dollars of money in afghanistan
usa looses 83 billion dollars of money in afghanistan

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानवर (Afghanistan) पुन्हा एकदा तालिबानची (Taliban) सत्ता आली आहे. तेथील लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेने (USA) मागील दोन दशकांमध्ये तब्बल 83 अब्ज डॉलर खर्च केला होता. परंतु तेच सैन्य ऐनवेळी काही क्षणांत कोसळून पडले. तालिबानने हिंसाचार न करता अफगाणिस्तानची सत्ता काबिज केली.

अमेरिकेने मागील 20 वर्षांत अफगाणिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षित केले. त्यासाठी अमेरिकेने या कालावधीत 83 अब्ज डॉलर खर्च केले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून टप्प्याटप्प्याने आपले लष्कर काढून घेण्यास सुरवात केल्यानंतर तालिबानचा प्रभाव वाढू लागला. आता तालिबाने संपूर्ण देशच ताब्यात घेतला आहे. एवढी वर्षे अमेरिकेने प्रशिक्षण दिलेल्या अफगाणी लष्कराने मात्र, तालिबानसमोर शस्त्र खाली ठेवणे पसंत केले. तालिबानने अफगाणिस्तानमधील सत्त्ता ताब्यात घेतली नाही तर अमेरिकेने दिलेला शस्त्रसाठा, दारूगोळा आणि हेलिकॉप्टरही मिळवले आहे.याचबरोबर अमेरिकेचे एक लढाऊ विमानही तालिबानच्या हाती लागले आहे. 

अफगाणिस्तानचे लष्कर एवढ्या कमी वेळेत तालिबानसमोर शरण कसे आले, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनाही हाच प्रश्न पडला आहे. अफगाणिस्तानमधील लष्करामध्ये इराकी लष्करामध्ये लढण्याची जिद्द नव्हती. इच्छाशक्ती व नेतृत्व पैशातून विकत घेता येत नाही, अशी कबुली संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बे यांनी दिली आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानात पोलीस दल आणि लष्कर उभारण्यात अपयश आले. 

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळाले आहेत. परंतु, त्यांच्या पळून जाण्यामुळे अफगाणिस्तानातील सर्वच नियोजित गोष्टींवर पाणी फेरले गेले असून, अमेरिकेसह इतर देशही तोंडावर पाडले आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून टप्प्याप्प्याने सैन्य काढून घेण्यास सुरवात केल्यानंतर तालिबानचा प्रभाव वाढू लागला होता. तालिबान देशावर कब्जा करणार हे स्पष्ट झाल्यानंतर कतारमधील दोहामध्ये तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये चर्चा झाली होती. दोन्ही बाजू दोन आठवडे शस्त्रसंधी करतील आणि अध्यक्ष अशरफ गनी हे राजीनामा देतील. त्यानंतर नवीन सरकार स्थापनेची तयारी सुरू होईल. परंतु, घनी हे आधीच पळून गेल्याने हा करारच मोडीत निघाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com