नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला! - Suryakant Ilame slams Nana Patoles supporters | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला!

अभिजीत घोरमारे
रविवार, 18 जुलै 2021

नाना पटोले यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना भाजपने आज धक्का दिला आहे. नानांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले त्यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण या प्रवेशानंतर इलमे यांनी थेट नानांच्या जवळचे नेते व कार्यकर्त्यांवर शरसंधान साधले आहे. नाना आजही माझे मोठे बंधू आहेत, पण जवळच्या लोकांनी माझ्याबद्दल चुकीचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहचवला, अशी इलमे यांनी सांगितले. (Suryakant Ilame slams Nana Patoles supporters)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इलमे यांनी भाजपचा हात धरला. त्यामुळं पटोले यांना ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी मोठा राजकीय धक्का बसला आहे. भंडारा जिल्ह्यात सूर्यकांत इलमे हे नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जात होके. `जहां नाना, वहां जाना` असे ब्रीदवाक्य ते नेहमी पाळायचे. नाना पटोलेंचे कोणतीही निवडणूक असली तरी इलमे यांचे नाव समोर असायचे. पटोले हे विधानसभा अध्यक्ष झाले तेव्हा `नाना पटोलेसे कुछ काम- तर सूर्या इलमे का नाम` असे समीकरण तयार झाले होते.

हेही वाचा :  पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटरने घेतला बाळाचा जीव; डॉक्टरनेच दिली कबुली

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर इलमे यांनी नानांवर नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, नाना आजही माझे मोठे बंधू आहेत, यापुढेही राहतील. पण त्यांच्या जवळच्या लोकांनी माझ्याबद्दल त्यांना चुकीचा मेसेज दिला. मी किती वाईट आणि किती चांगला आहे, हे माझ्या मोठ्या भावाला माहित आहे. भाजपमध्ये यापूर्वी काम केले असल्याने कोणता पक्ष कसा काम करता हे माहिती होतं. माझ्यासमोर भाजप हा एकच पर्याय होता, असं इलमे यांनी स्पष्ट केलं आहे. 

नाना प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात  काँग्रेस बळकट करण्यासाठी ते राज्य पिंजून काढत आहे. भाजपमध्ये गेलेल्या अनेक काँग्रेसच्या अनेक जुन्या नेत्यांना त्यांनी आवर्जून पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या परिस्थितीत  त्यांना स्वतःच्या जिल्ह्याचा विसर पडला. सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत  असे खंदे समर्थक भाजपच्या गळाला लागणे हे नाना पटोले यांना परवडणारे नाही.

इलमे यांची राजकीय कारकीर्द

*2006 ला राष्ट्रवादी नगरसेवक (भंडारा नगरपरिषद)

*2007-08 भंडारा नगर परिषद उपाध्यक्ष (राष्ट्रवादी)

*2009 नाना पटोलेंसोबत भाजप प्रवेश

*2010-14 भंडारा नगर परिषद गटनेते(भाजपा)

*2016 ला भाजपा नगराध्यक्ष टिकिट न मिळाल्याने भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश

*2016-17 शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविली मात्र पराभव

*2017 शिवसेना शहराध्यक्ष पद सोडत नाना समर्थक झाले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख