मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेला बडा नेता भाजपला धक्का देण्याच्या तयारीत?

नितीन पटेल यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. मनासारखे खाते न मिळाल्याने पक्षाविरोधात बंड पुकारणारे नितीन पटेल आता काय करतात याकडे लक्ष लागले आहे.
mumurs about nitin patel and shankar singh waghela meeeting
mumurs about nitin patel and shankar singh waghela meeeting

अहमदाबाद : विजय रूपानी (Vjay Rupani) यांनी गुजरातच्या (Gujarat) मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे आले आहेत. नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असून, नितीन पटेल (Nitin Patel) यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. चार वर्षांपूर्वी मनासारखे खाते न मिळाल्याने पक्षाविरोधात बंड पुकारणारे नितीन पटेल आता काय करतात याकडे लक्ष लागले आहे. 

गुजरातच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल झाला. यात 24 मंत्र्यांनी शपथ घेतली. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री बनल्याने आधीचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची खुर्ची गेली आहे. हे दोन्ही नेते पाटीदार समाजाचे आहेत. पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे जातीय समीकरणावर भाजपकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. यामुळे एकाच समाजातील नेत्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद देणे भाजपने टाळले आहे. यामुळे नितीन पटेल यांना मंत्रिमंडळातून वगळले आहे. परंतु, त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आता भाजपसमोर आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

मंत्रिमंडळाच्या शपथविधीला नितीन पटेल हे उपस्थित होते. पंरतु, त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपू शकली नाही. याच नितीन पटेलांना 2017 मध्ये अर्थ मंत्रालय देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी उघडपणे पक्ष नेतृत्वाला आव्हान देत बंड पुकारले होते. केवळ मनासारखे खाते न मिळाल्याने बंड करणारे नितीन पटेल गप्प कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. असे असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे नितीन पटेल आगामी काळात भाजपला धक्का देऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 

भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात 24 मंत्री आहेत. काल त्यांचा शपथविधी झाला आहे. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे अनेक बड्या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. जातीय समीकरणांचा समतोल राखतानाच स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना मंत्रिमंडळात विशेषकरून स्थान मिळाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.  

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन राजीनामा सोपवला होता. यानंतर भाजपच्या आमदारांची बैठक होऊन त्यात भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com