सीमावाद पेटला : बारामतीचे वैभव निंबाळकर 70 दिवसांपूर्वीच झालेत पोलिस अधिक्षकपदी रुजू 

निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्याचे समजते.
SP Vaibhav Nimbalkar from Baramati injured in Assam
SP Vaibhav Nimbalkar from Baramati injured in Assam

नवी दिल्ली : आसाम व मिझोराम सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलिस दलातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह सुमारे 50 पोलिस जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. निंबाळकर हे मुळचे बारामतीचे असून आसाम केडरचे अधिकारी आहेत. ते 70 दिवसांपूर्वीच काचारच्या पोलिस अधिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. (SP Vaibhav Nimbalkar from Baramati injured in Assam)

निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्याचे समजते. आसामच्या मुख्यमंत्र्यांनीच ट्विटरवरून पोलिसांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. या घटनेनंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. सीमेवरील तणावात वाढ झाल्यानंतर निंबाळकर हे पोलिस कर्मचाऱ्यांसह बंदोबस्ताला होते. पण वाद चिघळत गेल्याने त्यांच्या दिशेने दगडफेक व गोळीबार सुरू झाला. यामध्ये सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर निंबाळकर यांच्यासह 50 पोलिस जखणी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे समजते. 

निंबाळकर हे मुळचे बारामतीचे असून 2009 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना आसाम केडर मिळाल्यानंतर तेव्हापासून तिथेच कार्यरत आहेत. त्यांनी काचार जिल्ह्यात यापूर्वीही काम केले आहे. काचार येथे अधिक्षक म्हणून ते 17 मे रोजी रुजू झाले आहेत. त्यापूर्वी ते तीनसुखिया येथे अधिक्षक होते. त्यांनी 2012-23 मध्ये काचारमध्ये काम केले आहे. 

दरम्यान, गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील कोचर, हेलकांडी आणि करीममंग या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. 

शहा हे दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत परतले आहेत. त्यानंतर लगेचच दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव वाढला आहे. सोमवारी मिझोराममधील एका दाम्प्यत्यावर आसाममधील काही गुंडांनी हल्ला केल्याचे ट्विट मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी केलं होतं. त्यानंतर हा वाद आणखी वाढत गेला. दोन्ही बाजूने पोलिस व नागरिकांनी जोरदार दगडफेक केल्याचे वृत्त आहे. तसेच दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याचेही सांगितले जात आहे. 

अजूनही सीमेजवळील जंगलात लपून बसलेल्या आसाममधील एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू आहे. काचारचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह सुमारे 50 जण जखमी झाले आहेत.' तर आसामचे मुख्यमत्री हिमंता बिस्व सरमा यांनी ट्विट करून सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा या हिंसाचारात मृत्यू झाल्याची माहिती दिली. सीमेचे संरक्षण करताना सहा शुर पोलिसांनी बलिदान दिल्याचं सरमा यांनी म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com