अमित शहांनी पाठ फिरवली अन् दोन राज्यांतील वाद चिघळला - Tension on Assam and Mizoram state Border after Amit Shahs visit-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

अमित शहांनी पाठ फिरवली अन् दोन राज्यांतील वाद चिघळला

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जुलै 2021

दोन्ही राज्यांच्या सीमेवर हिंसाचार सुरू असून फायरींग झाल्याचंही वृत्त आहे.

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधील वाद चिघळला आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवर हिंसाचार सुरू असून फायरींग झाल्याचंही वृत्त आहे. सरकारी वाहनांवरही हल्ला झाल्याचं समोर आले आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून एकमेकांबद्दल तक्रार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना टॅग केले. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. (Tension on Assam and Mizoram state Border after Amit Shahs visit)

शहा यांनी नुकतेच आसाममध्ये बोलताना पूर्वेकडील राज्यांमध्ये शांतता असल्यांचे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांतच हिंसाचार सुरू झाला आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी याबाबत ट्विट करून शहा यांनाच यातून मार्ग काढण्याची विनवणी केली आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडिओही असून त्यात अनेक लोक हातात लाठ्या घेतल्याचे दिसत आहे. 'मिझोरामला परत येताना एका दाम्पत्यावर गुंडांनी हल्ला केला. तसेच तोडफोडही केली. तुम्ही या हिंसक घटनांबाबत कसा न्याय देणार?,' असं त्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

हेही वाचा : चिपळूणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं!

अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर आश्चर्यकारकरीत्या आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या व नागरिकांकडून मिझोराममध्ये लाठीचार्ज करण्यात आला. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या, असा आरोपही झोरामथांगा यांनी अन्य एका ट्विटमध्ये केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनीही ट्विट करून मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.

'आदरणीय झोरामथांगाजी, कोलाबिस (मिझोराम) च्या एसपींनी आम्हाला आमच्या पोस्टवरून हटण्यास सांगितले आहे. तुमचे नागरिक शांत बसत नाही तसेच हिंसा थांबवत नाहीत, तोपर्यंत पोस्ट हटवावी, असं एसपींनी म्हटलं आहे. अशा स्थिती आम्ही सरकार कसं चालवू. तुम्ही लवकरात लवकर दखल घ्याल, अशी अपेक्षा आहे,' असं बिस्वा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. आसाममध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. तर मिझोराममध्ये मित्रपक्षांच्या मदतीने भाजप सत्तेत आहे. 

दरम्यान, मिझोराममधील ऐजॉल, कोलाबिस आणि मामित तर आसाममधील कोचर, हेलकांडी आणि करीममंग या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. या सीमेची लांबी 164.6 किमी एवढी आहे. मागील अनेक वर्षांपासून सीमाप्रश्नाचा मुद्दा असून त्यावरून सातत्याने हिंसा होते. दोन्ही राज्यांतील नागिरक अनेकदा एकमेकांना भिडतात. जून महिन्यातही अशीच घटना घडली होती. मिझोरामप्रमाणे आसामच्या सीमेवरून मेघालय आणि अरूणालल प्रदेश या राज्यांशीही वाद आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख