नाना पटोलेंच्या स्वबळाच्या गुगलीवर संजय राऊतांची जोरदार फटकेबाजी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे.
shivsena leader sanjay raut says nana patole comments not affect government
shivsena leader sanjay raut says nana patole comments not affect government

मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. यावर आता शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा केला आहे. पटोले यांच्या विधानांचा सरकारवर कोणताही परिणाम होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून आघाडी सरकावर टीका केली. यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे हे कसले सरकार चालवणार, असा टोला विरोधकांनी लगावला. स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा, अशा पटोलेंच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीनाट्य दिसून येत आहे. 

याबाबत संजय राऊत म्हणाले की, राज्यातील महाविकास  आघाडीचे सरकार भक्कम स्थितीत आहे. नाना पटोले यांच्या विधानाचा  सरकारवर  परिणाम  नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र  निवडणूक  लढले. त्यामुळे तुम्ही स्वबळावर लढणार का, असा सवाल शरद पवार काँग्रेसला करु शकतात .

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा मुद्दा सध्या गाजत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, भाजपचा हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची नाराजी भाजपच्या नेत्यांनी तपासावी आणि त्याचे निराकरण करावे . 

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. याबाबत राऊत म्हणाले की, प्रशांत किशोर कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत हे मला माहिती नाही. ते  सगळ्याच राजकीय पक्षांना भेटत असतात. विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत ते ठोस निर्णय घेऊ  शकतील, अशी शक्यता मला वाटत नाही. यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेणारे शरद पवार हे पटोलेंच्या विधानामुळे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पवारांची नाराजी दूर करण्याची काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील एच.के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com