मोठी बातमी : छगन भुजबळांसह मुलगा पंकज अन् पुतण्या समीर अखेर सुटले

राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
session court gives relief to minister chhagan bhujbal
session court gives relief to minister chhagan bhujbal

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) गैरव्यवहार प्रकरणात क्लिनचिट दिली आहे. महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराच्या आरोपातून भुजबळ मुक्त झाले असून, या प्रकरणातून त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. याच गैरव्यवहार प्रकरणात भुजबळ यांना दोन वर्षे कारागृहात काढावी लागली होती.

सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना विशेष न्यायालयाने नुकतेच दोषमुक्त केले होते. महाराष्ट्र सदन नूतनीकरण कंत्राटामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसून त्याबाबतचा कुठलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पुरावा आढळलेला नाही, असे निरीक्षण त्यावेळी न्यायालयाने नोंदविले आहे. या खटल्यात आरोपी असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला दोषमुक्ततेचा अर्ज मात्र अद्याप प्रलंबित होता. आज भुजबळांचे नावही या प्रकरणातून वगळण्यात आले आहे.

या गैरव्यवहार प्रकरणातून मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव गंगाधर मराठे यांचे नावही वगळण्यात आले आहे. 

विशेष न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनी नुकतेच माजी निरीक्षक अभियंता अरुण देवधर, कृष्णा चमणकर, प्रवीणा चमणकर, प्रणिता चमणकर आणि प्रसन्ना चमणकर यांना या प्रकरणात न्यायालयाने दोषमुक्त केले होते. महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणाचे काम पाहणाऱ्या के. एस. चमणकर एंटरप्राइजेसने तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री भुजबळ यांच्या कुटुंबीयांना सुमारे १३.५ कोटी रूपये दिल्याच्या अभियोग पक्षाच्या आरोपात तथ्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. 

फौजदारी कारवाई करण्यासाठी बेकायदेशीर कृत्य केल्याचा पुरावा आवश्यक असते. मात्र, या प्रकरणात तसा बेकायदेशीरपणा आढळत नाही. त्यामुळे या आरोपींना दोषी ठरविता येणार नाही. भुजबळ आणि त्यांच्या निकटवर्तीयांना मिळालेले कथित १३.५ कोटी रुपये भ्रष्टाचाराचे किंवा हितावह काम साधण्यासाठी मिळालेले आहेत का हे उपलब्ध पुराव्यांवर तपासता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. या व्यवहाराचे कारस्थान नक्की कधीपासून, २००१ की २००५ पासून सुरू झाले, याबाबत तपासयंत्रणा संभ्रमित आहे. यामध्ये विशिष्ट आरोप, दिवस किंवा दाखला अभियोग पक्षाने दाखल केलेला नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com