'माजी मंत्री म्हणू नका' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांना राऊंताचा फोन अन् म्हणाले...

शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांची पाटील यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.
Sanjay Raut criticizes Chandrakant Patil over his Comment
Sanjay Raut criticizes Chandrakant Patil over his Comment

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. गुरूवारी केलेल्या एका नव्या विधानामुळे राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असे सांगत एक प्रकारे राजकारणात स्फोट होणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत. पण शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांची पाटील यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. (Sanjay Raut criticizes Chandrakant Patil over his Comment)

मुंबईत शिवसेनेच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राऊत यांनी पाटील यांच्या विधानावर भाष्य केलं. ते म्हणाले, चंद्रकांत पाटील सगळ्यांना सांगत होते की मला माजी मंत्री म्हणून नका. दोन दिवस थांबा. मी त्यांना फोन करून सांगितलं, 'तुम्ही पुढील 25 वर्ष माजी मंत्री राहणार.' कारण ज्याप्रकारचं सरकार महाराष्ट्रात आपण स्थापन केलं आहे, ते केवळ पाच वर्षांसाठी नसून 25 वर्षांसाठी आहे. या राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे. जेव्हा ठाकरे राज्याचे नेतृत्व करतात, ते अर्धवट सोडून जात नाहीत. ते पूर्ण काळासाठी करतात. 

पाटील यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तसेच पाटील यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. देहू गावात एका खाजगी दुकानाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेव्हा सूत्रसंचालक नियमीत माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख करत होता. तेव्हा त्यांनी हे सूचक विधान केले होते.

दरम्यान, राऊत यांनी शिवसेना महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले आहे. महाराष्ट्रात आपलं सरकार चांगलं काम करत आहे. शिवसेना महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे. आपण जुगाड करून सत्ता आणली हे खरं आहे. स्वबळाचा नारा जेव्हा उद्धवजी देतात तेव्हा आपल्याला 150 जागा जिंकता आल्या पाहिजेत, असं राऊत म्हणाले. 

कुणाच्याही कुबड्यांशिवाय पहिल्या क्रमांकाचा पक्ष करायचा आहे. जर काहीच नसलेल्या भाजपला 105 जागा मिळतात, तर शिवसेना हा त्यापेक्षा मोठा पक्ष आहे. आजही हा पक्ष बाळासाहेबांच्या विचाराने चालतो. मुंबई, महाराष्ट्रात जागोजाग शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. मुंबई महापालिकेत आपण 140 जागा जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com