नवख्या मुख्यमंत्र्यांकडं गृह विभागासह तब्बल नऊ खाती

आधीच्या मंत्रिमंडळात असलेलं उपमुख्यमंत्री पदही यावेळी ठेवण्यात आलेलं नाही.
Bhupendra Patel Keeps Home Urban Development Portfolios
Bhupendra Patel Keeps Home Urban Development Portfolios

गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Gujrat CM Bhupendra Patel) यांच्या मंत्रिमंडळाचा गुरूवारी दुपारी शपथविधी झाला असून रात्री खातेवाटपही करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळात 24 मंत्र्यांचा समावेश आहे. यात आधीच्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेले नाही. तसेच आधीच्या मंत्रिमंडळात असलेलं उपमुख्यमंत्री पदही यावेळी ठेवण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडं गृह खात्यासह नऊ महत्वाची खाती ठेवली आहेत. (Bhupendra Patel Keeps Home Urban Development Portfolios)

विजय रुपानी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांनाच धक्का दिला. पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी गुरूवारी रुपानी यांच्या मंत्रिमंडळातील एकाही आमदाराला पटेल यांच्या मंत्रिमंडळात संधी दिली नाही. गुजरातमधील नेत्यांसाठी हा दुसरा धक्का होता. 

नवीन मंत्रिमंडळाचा गुरूवारी दुपारी शपथविधी झाला. त्यानंतर सायंकाळी पटेल यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठकही घेतली. तर रात्री खातेवाटप जाहीर केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडं दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं गृह खातं ठेवलं आहे. तसेच सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण, उद्योग, खाणी व खनिजे, नगर विकास, शहरी गृहनिर्माण, नम्रदा व पोर्ट्स आदी नऊ खातीही त्यांच्याकडं आहेत.  

भूपेंद्र पटेल यांचे नवे मंत्रिमंडळ 

कॅबिनेट मंत्री : 
राजेंद्र त्रिवेदी - महसूल, विधी व न्याय                                          कनुभाई देसाई - अर्थ, ऊर्जा
जीतू वाघानी - शिक्षण
ऋषिकेश पटेल - आरोग्य, पाणीपुरवठा
राघव पटेल - कृषी व पशुसंवर्धन
पूर्णेश मोदी - रस्ते व बांधकाम, वाहतूक, पर्यटन 
नरेशभाई पटेल - आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा
प्रदीपसिंह परमार - सामाजिक न्याय
अर्जुनसिंह चव्हाण - गामविकास व ग्रामीण गृहनिर्माण
किरीटसिंह राणा - वन, पर्यावरण, हवामान बदल

राज्यमंत्री : 
निमिषा सुतार - आदिवासी विकास, आरोग्य व कुटूंबकल्याण, वैद्यकीय शिक्षण 
मुकेश पटेल - कृषी, उर्जा 
अरविंद रैयाणी - वाहतूक, पर्यटन
कुबेर डिंडोर - उच्च व तंत्र शिक्षण
कीर्तिसिंह वाघेला - प्राथमिक, माध्यमिक शिक्षण
गजेंद्रसिंह परमार - अन्न व नागरी पुरवठा
देवाभाई मालम - पशु संवर्धन 
राघवजी मकवाना - सामाजिक न्याय 
विनोदभाई मोराडिया - नगर विकास व शहरी गृहनिर्माण

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) :
हर्ष संघवी - गृह, आपत्ती व्यवस्थापन, क्रीडा, 
बृजेश मेरजा - कामगार व रोजगार, पंचायत
मनिषा वकील - महिला व बाल विकास
जगदीशभाई पांचाल - सहकार, उद्योग, वन व पर्यावरण
जीतूभाई चौधरी - मत्स्य, नम्रदा, पाणीपुरवठा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com