रामदास आठवलेंची उत्तर प्रदेशात फिल्डींग; भाजपकडं केली ही मागणी

उत्तर प्रदेशात भाजपकडून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
Ramdas Athawles Party will contest UP Assembly election
Ramdas Athawles Party will contest UP Assembly election

मुंबई : उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एका कार्यक्रमात निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. भाजपसाठी महत्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले यांनीही फिल्डींग लावल्याचे समोर आले आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला आव्हान देणार असल्याचा दावा आठवलेंनी केला आहे. (Ramdas Athawles Party will contest UP Assembly election)

उत्तर प्रदेशात भाजपकडून पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मित्रपक्षांना सोबत घेण्याबरोबरच त्यांना अपेक्षित असलेल्या जागांबाबत तडजोड करण्याची भूमिकाही भाजपने घेतली आहे. त्यामुळं आरपीआयनंही एनडीएत असल्याचं सांगत भाजपकडं विधानसभेच्या 10 ते 12 जागांची मागणी केली आहे. 

आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपकडं जागांची मागणी केल्याची माहिती दिली. आठवले हे 2014 पासून भाजपप्रणित एनडीएसोबत आहेत. उत्तर प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपनं आरपीआयलाही सोबत घ्यावं, यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. . 

आठवले म्हणाले, भाजपनं आरपीआयला सोबत घेतल्यास बहूजन समाज पक्षाचं मोठं नुकसान होऊन भाजपला फायदा होईल. दलित मतदार आरपीआयकडे येऊ शकतील. लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागा वाटपाबाबत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी आरपीआय 26 सप्टेंबरपासून सहरनपूर जिल्ह्यातून बहुजन कल्याण यात्रेची सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही यात्रा जाणार असून 18 डिसेंबर रोजी लखनऊमध्ये सांगता होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली.

दरम्यान, उत्तर प्रदेशात मायावतींचा यांचा जनाधार मोठा आहे. त्या राज्याच्या मुख्यमंत्रीही होत्या. आगामी निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ब्राम्हण संमेलनाचे आयोजन करत ब्राम्हण समाजाला पुन्हा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याचे म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com