तालिबान्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांशी! खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा

तालिबान्यांची तुलना स्वातंत्र्यसैनिकांशी करणे एका खासदाराला महागात पडले आहे. या खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
samajwadi party mp compares taliban to indian freedom fighters
samajwadi party mp compares taliban to indian freedom fighters

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळाले आहेत. तालिबान्यांची तुलना स्वातंत्र्यसैनिकांशी करणे एका खासदाराला महागात पडले आहे. या खासदारावर देशद्रोहाचा (Sedition) गुन्हा दाखल झाला आहे. 

समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील खासदार शफिकूर  रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq)  यांच्यासह इतर दोघांविरुद्ध पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चंबळ जिल्ह्याचे पोलीस अक्षीक्षक चरखेश मिश्रा म्हणाले की, शफिकूर रहमा यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तालिबानबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केले होते. त्यांनी तालिबान्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांशी केली होती. त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करावा, असेही त्यांनी म्हटले होते. भारत सरकारने तालिबानला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. यामुळे त्यांचे वक्तव्य देशद्रोह असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

लोकसभा खासदार बर्क म्हणाले होते की, तालिबानला अफगाणिस्तानला स्वांतत्र्य मिळवून द्यायचे होते. त्यांना त्यांचा देश स्वत:च चालवायचा होता. त्यांनी रशियाला आणि अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये बस्तान बसवून दिले नाही. आता सध्या अफगाणिस्तानमध्ये जे घडत आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. यात आपण हस्तक्षेप करु नये. 

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. या घडामोडींमुळे जगभरातील अनेक देशांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com