योगी विरुद्ध प्रियांका रंगणार सामना; उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 'कॅप्टन'

उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याच कॅप्टन असतील, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत.
salman khurshid says priyanka gandhi will be captain in uttar pradesh
salman khurshid says priyanka gandhi will be captain in uttar pradesh

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) याच कॅप्टन असतील, असे संकेत काँग्रेसने दिले आहेत. प्रियांका गांधी यांची प्रतिमा उच्च असून, त्या राज्यात पक्षाचे नेतृत्व करतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद (Salman Khurshid) यांनी म्हटले आहे.  पुढील निवडणुकीत योगी विरुद्ध प्रियांका असे चित्र दिसणार आहे. 

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. मागील काही दिवसांपासून प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात सक्रिय आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यातील भाजप सरकारवर त्या सातत्याने हल्लाबोल करीत आहेत. राज्यातील पक्ष संघटनेतही त्यांनी आधीपासूनच लक्ष देण्यास सुरवात केली होती. या पार्श्वभूमी राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील नेते जितिन प्रसाद यांनी नाराज होऊन काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपसमोर काँग्रेसचे मोठे आव्हान असून निवडणुकीत संपूर्ण शक्तीनिशी प्रियांका गांधी मैदानात उतरतील. निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा आघाडीसाठी कुणाचीही वाट पाहणार नाही. सध्या आहे त्या मंडळीसोबत आम्ही लढण्यास तयार आहोत. , असे खुर्शिद यांनी सांगितले. खुर्शिद यांनी एकप्रकारे स्वबळाचाच नारा उत्तर प्रदेशात दिल्याचे मानले जात आहे. ते उत्तर प्रदेश जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. 

मुख्यमंत्रिपदासाठी प्रियांका गांधी या सर्वांत योग्य उमेदवार आहेत का, यावर खुर्शिद म्हणाले की, याबाबत जोपर्यंत स्पष्ट संकेत मिळत नाहीत, तोपर्यंत मी या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकत नाही. मात्र, या पदासाठी त्या सर्वोत्तम उमेदवार आहेत. 

खुर्शिद म्हणाले की, तुम्हाला एवढेच काम करायचे आहे, की मुख्यमंत्री योगी आणि प्रियांका गांधी यांचा फोटो समोर ठेवा. तुम्ही आणखी काही प्रश्‍न विचारायची गरज नाही. प्रियांका  या उत्तर प्रदेशातील मतदारांना कसे सामोरे जातात, हा त्यांचा निर्णय असेल. त्या आमच्या कॅप्टन आहेत. आम्ही तीव्र संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. आमच्याकडे असलेल्या सामर्थ्याच्या बळावर शक्तीनिशी लढण्याचे आम्ही ठरवले आहे. 

मागील निवडणुकीत काँग्रेसला केवळ 7 जागा 
मागील विधानसभा निवडणुकीत 2017 मध्ये काँग्रेसला राज्यात केवळ सात जागा मिळाल्या होत्या. राज्यात एकून 403 जागा असून, भाजपने 312 जागा जिंकून दणदणीत यश मिळवले होते. समाजवादी पक्षाला 47 जागा मिळाल्या होत्या तर बहुजन समाज पक्षाला 19 जागा मिळवता आल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com