दुसरं तळीये टाळण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल

महाड व पोलादपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून 95 जणांचा मृत्यू झाला होता.
raigad district administration will relocate residents due to taliye tragedy
raigad district administration will relocate residents due to taliye tragedy

अलिबाग : महाड व पोलादपूर तालुक्यात  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून ९५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्राथमिक पाहणीत काही गावांमध्ये जमिनीला मोठ्या भेगा पडल्याचे समोर आले. यातच हवामान विभागाने घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील दरडप्रवण भागातील दीड हजार नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. 

तळीये येथील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने दरडप्रवण भागातील गावांचे सर्वेक्षण करण्यास भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, राज्य इकाई-महाराष्ट्र तसेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला सांगितले होते. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जगदीश हिंदीयार यांचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले आहे. ते सविस्तर निरिक्षण करून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला अहवाल सादर करणार आहेत. रायगड जिल्ह्यात 22 जुलैच्या अतिवृष्टीमध्ये दरडी कोसळून एकूण 95 जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर या गावांमध्ये दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. 

प्राथमिक स्वरूपात भूगर्भतज्ज्ञांनी पाहणी केली असून, यानुसार, महाबळेश्वर परिसरातील मुसळधार पाऊस आणि भूकंपप्रवण क्षेत्रामुळे डोंगर-उतारावरील मुरूम-माती सरकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर उत्खनन, वृक्षतोड याचाही परिणाम होत आहे. त्यामुळे तळीये येथे कोसळलेली दरड कधीतरी कोसळणारच होती. काळ्या पाषाणाच्या उंच सुळक्यावरील माती मुसळधार पावसात सैल झाली. त्यामुळे साधारण तीन ते साडेतीन एकरचा भूभाग वेगाने खाली घसरल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. 

जिल्हा प्रशासनाने स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या गावांमध्ये महाड तालुक्यातील  4 आणि पोलादपूर तालुक्यातील 9 गावांतील 413 कुटुंबांतील 1,555 व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात महाड तालुक्यातील हिरकणी वाडी, मोहोत सुतारवाडी, मोहोत भिसेवाडी, वाघेरी आणि पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी, साखर चव्हाणवाडी, साखर पेढेवाडी, केवनाळे, दाभीळ, चरई, माटवण, सवाद आदी गावांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com