फडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर

कोल्हापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये आहे.
फडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर
Devendra Fadnavis visited flood affected people in Kolhapur .jpg

कोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करत ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, त्यांनी आज (ता. ३० जुलै) चिखली गावातील नागरिकांशी संवाद सांधला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, त्या गर्दीमध्ये अनेक नागरिकांनी मास्क घातलेले नव्हते. सोशल डिस्टेंसिंगचाही फज्जा उडाला. (Devendra Fadnavis visited flood affected people in Kolhapur) 

राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॅाकडाऊनचे निर्बंध शिथील केले जाणार आहेत. मात्र, अपेक्षित रुग्णसंख्या कमी होत नसलेल्या 11 जिल्ह्यांमधील लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. निर्बंध कायम राहणाऱ्या 11 जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांतील रुगसंख्या आणकी वाढल्यास लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक केले जातील. असेही टोपे यांनी सांगितले होते. 

त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात अजूनही. अशातच फडणवीस यांच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना नियम मोडले जात आहेत. चिखली गावातील नागरिकांना कोरोनाचे भय नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. 

दरम्यान, फडणवीस यांनी गुरुवारी बेघर येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबातील लोकांशी संवाद साधला होता. त्यांचे दुःख समजून घेतले. त्यांच्या सोबत जेवणही करून त्यांनी धीर दिला. त्यामुळे उपस्थीत बाधितांनाही आश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या दुःखाचा बांध तेथे मोकळा केला.

आम्ही तुमच्या सोबत असून आम्ही तुमचे भाऊ आहोत, असे म्हणत बाधित कुटुंबातील लोकांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. त्यांच्यासोबत जेवणाच्या आग्रहाचा स्वीकार करीत जेवणही घेतले. आमदार प्रविण दरेकर यांनी सुद्धा त्यांची सोबत बसून जेवण घेतले. फडणवीस आंबेघर येथे भूस्खलनामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील लोकांची भेट घेण्यासाठी आले होते. 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in