राहुल गांधींनी नवज्योतसिंग सिद्धू यांना पाडले तोंडघशी - rahul gandhi says no meeting scheduled with navjot singh sidhu | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

राहुल गांधींनी नवज्योतसिंग सिद्धू यांना पाडले तोंडघशी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 जून 2021

कोरोनाचा कहर कमी होत असताना पंजाब काँगेसमधील कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर कमी होत असताना पंजाब (Punjab) काँगेसमधील  (Congress) कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh  Sidhu) यांनी आघाडी उघडली आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी गांधी परिवाराशी भेट ठरल्याचे जाहीर केले होते. परंतु, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी याचा इन्कार केल्याने सिद्धू तोंडघशी पडले आहेत. 

सिद्धू हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी भेट घेतील, असे सिद्धू यांच्या समर्थकांना जाहीर केले होते. राहुल गांधी यांनी मात्र, अशी कोणतीही भेट ठरली नसल्याचे जाहीर केले आहे. मागील अनेक दिवसांपासून सिद्धू हे पक्षनेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही पक्ष नेतृत्वाने भेट दिलेली नाही. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

हेही वाचा : आता मॉडर्नाची लसही भारतात उपलब्ध होणार 

मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सिद्धू हे आपमध्ये जाणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सिद्धू यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत हे सिद्ध करण्याचे खुले आवाहन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर इतर नेते व मंत्रीही नाराज आहेत. सिद्धू यांच्यासह नाराज मंत्री, आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नुकतेच दिल्लीत बोलावण्यात आले होते. 

तसेच, काँग्रेस नेतृत्वाकडून हरीश रावत यांच्यासह तीन जणांची समितीही तयार करण्यात आली आहे. या समितीने सिध्दू, काँग्रेस नेते परगतसिंग आणि इतर नेत्यांना भेटती होती. तसेच, मुख्यमंत्रीही या समितीसमोर म्हणणे मांडले होते. निवडणूकीआधी काँग्रेसमधील कलह कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या समितीसमोर मागील आठवड्यात दुसऱ्यांदा अमरिंदरसिंग हजर झाले होते. तसेच, सिद्धूही दोनदा या समितीला भेटले आहेत. अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न ही समिती करीत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख