किशोर यांचे काँग्रेसमध्ये स्वागत! राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे ट्विट अन् डिलिट - rahul gandhi close aid archana dalmia welcomes prashant kishor in congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

किशोर यांचे काँग्रेसमध्ये स्वागत! राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याचे ट्विट अन् डिलिट

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जुलै 2021

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधींची (Priyanka Gandhi) घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यातच राहुल गांधींच्या निकटवर्तीय नेत्याने ट्विटरवर किशोर यांचे काँग्रेसमध्ये जाहीर स्वागत करुन नंतर ते ट्विट डिलिट केल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्या अर्चना दालमिया यांनी प्रशांत किशोर यांच्याबद्दल ट्विट केले होते. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले असूनस, त्यांचे पक्षात मनापासून स्वागत. काँग्रेस परिवारात त्यांचे अतिशय स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले होते. या ट्विटमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली. काही मिनिटातच दालमिया यांनी हे ट्विट डिलिट केले. यामुळे किशोर यांच्या अधिकृत काँग्रेस प्रवेशाचे संकेत मिळत असून, याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांसोबत किशोर यांची बैठक झाली होती. याआधी अनेक वेळा अशा बैठका झाल्या आहेत. किशोर यांनी काँग्रेसमध्ये रणनीतीकार अशी भूमिका देण्यावर प्रस्ताव समोर आला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम पाहतील, अशी शक्यता यामुळे समोर आली आहे. 

किशोर यांची गांधी परिवारासोबतची बैठक ही केवळ पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. यामागे मोठे कारण आहे. किशोर यांना काँग्रेसमध्ये मोठी भूमिका बजावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस पक्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करू लागला आहे. यात किशोर हे महत्वाची भूमिका बजावतील, असे सूत्रांनी सांगितले. 

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर रणनीतीकार म्हणून लक्षवेधी कामगिरी केली होती. बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींची सत्ता आणून भाजपला धूळ चारली होती. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि भाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ममतांचा विजय झाला होता. किशोर यांनी तमिळनाडूत द्रमुकचे एम.के.स्टॅलिन यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

हेही वाचा : रेल्वे मंत्रालय काढून घेतल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्रातील नेत्यावर मोठी जबाबदारी 

बंगाल आणि तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्त होण्याची घोषणा किशोर यांनी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, मला आता हे काम करायचे नाही. मी खूप काम केले आहे. आता मी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आयुष्यात मी आता वेगळे काही तरी करेन. पुढे काय करायचे यावर मी विचार करतोय. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख