एका चहाने संपला मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्षांमधील चार महिन्यांचा दुरावा...

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद अखेर शमला आहे.
punjab cm amarinder singh meets congress state persident navjot singh sidhu
punjab cm amarinder singh meets congress state persident navjot singh sidhu

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यातील वाद अखेर शमला आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत पंजाब भवनमध्ये एकत्रित चहा घेतला. चार महिन्यांपासून सुरू असलेला दुरावा अखेर चहाच्या निमित्तामुळे संपला आहे. 

काँग्रेस नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब भवनमध्ये आज सिद्धू सुरवातीला दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. या वेळी माध्यमांना आतमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. केवळ मंत्री, आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांनाच प्रवेश दिला गेला होता.  सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रित चहा घेतला. 

या वेळी पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि सिद्धू एकमेकांशेजारी बसले होते. या वेळी दोघांनी एकमेकांशी हास्यविनोदही केले. या चहापानाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी, प्रतापसिंग बाजवा आणि लालसिंग हे सुद्धा उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि सिद्धू यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर चार महिन्यांनी दोघे एकमेकांना आज भेटले. 

सिद्घू हे आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. याचबरोबर चार कार्याध्यक्षही पदभार स्वीकारतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, माझी नियुक्ती ही सोनिया गांधी यांनी केली आहे. माझी तुमच्या विरोधात भूमिका नाही. लोकांच्या बाजूची माझी भूमिका आहे. तुम्ही पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येऊन काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीली आशीर्वाद द्यावेत. 

सिद्धू वगळता मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नवीन चार कार्यकारी अध्यक्षांची काल (ता.22) भेट घेतली होती. सिद्घू यांनी पदभार घेण्याआधी सर्व आमदार, खासदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी चहाला बोलावले होते. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com