नवऱ्याच्या पॉर्न रॅकेटवर अखेर शिल्पाने मौन सोडलं अन् म्हणाली, एक दीर्घ श्वास घेते...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
actress shilpa shetty talks about husband raj kundra arrest
actress shilpa shetty talks about husband raj kundra arrest

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हे मोठे रॅकेट असून, यामागील सूत्रधार राज कुंद्रा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. यावर अखेर शिल्पाने मौन सोडले आहे. 

शिल्पाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्याला दु:ख देणाऱ्या व्यक्तींकडे आपण रागाने पाहतो. त्यांच्यामुळे झालेला त्रास आपल्याला आठवतो. त्यांच्यामुळे आपल्यावर ओढवलेले दुर्दैवी प्रसंग आठवतात. त्यामुळे आपण भविष्याकडे चिंतेने पाहतो. आपली नोकरी गमावली जाईल का, एखादा रोग होईल का अथवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल का, अशी भीती आपल्याला सतावत असते. आपण या ठिकाणी इथेच असायला हवे. सगळ्या गोष्टींकडे व्यवस्थितपणे पाहायला हवे. 

मी एक दीर्घ श्वास घेते आणि जिवंत असल्याबद्दल स्वत:ला सुदैवी समजते. मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. यापुढे मी आव्हानांचा सामना करीत राहीन. माझे आजचे आयुष्य जगण्यापासून मला कुणीही विचलित करु शकत नाही, असेही शिल्पाने म्हटले आहे. 

या प्रकरणी राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिचा सहभाग होता का याचाही तपास पोलीस करीत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टीचा या प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता समोर आली होती. परंतु, तिच्या विरोधात अद्याप कोणताही पुरावा समोर आलेला नाही. सध्या तरी तिच्या या प्रकरणात सक्रिय सहभाग समोर आलेला नाही. आम्ही अद्याप तपास करीत आहोत. या प्रकरणातील पीडितांनी पुढे येऊन गुन्हे शाखेशी संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली आहे. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना फेब्रुवारीमध्ये मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळी या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com