काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी वेळ मागितली पण मुख्यमंत्र्यांनी दिलीच नाही!

पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद अद्याप मिटला नसल्याचे समोर आले आहे.
punjab cm amarinder singh does not meet navjot singh sidhu
punjab cm amarinder singh does not meet navjot singh sidhu

नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu)  यांनी उघड बंड पुकारले होते. पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देऊन हे बंड शमवले. असे असले तरी सिद्धू यांनी भेटीची वेळ मागिलली असून, कॅप्टन यांनी अद्याप वेळ दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 

पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याचबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे. 

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर सिद्धू यांनी कॅप्टन यांच्यासोबतच्या वाद मिटवण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली होती. परंतु, त्यांना अद्याप भेटीची वेळ दिलेली नाही. याचबरोबर सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होऊन दोन दिवसांनंतरही मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने सिद्धू यांच्या पारड्यात वजन टाकल्याने मुख्यमंत्री नाराज आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : काँग्रेस स्वबळावरच! नाना पटोलेंना राहुल गांधींचा ग्रीन सिग्नल

सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याच्या प्रस्ताव पक्षाने ठेवला होता. यावर कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्र लिहिले होते. कॅप्टन यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची  भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सांगतील तो तोडगा मान्य असेल, असे म्हटले होते. कॅप्टन यांचे पत्र मिळताच पक्ष नेतृत्वाने तातडीने रावत यांनी चॉपरने पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या भेटीसाठी पाठवले होते. रावत यांच्या भेटीनंतर अखेर कॅप्टन यांनी हा प्रस्ताव मान्य केला होता. 

पंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटवले गेले आहे. सिद्धू यांच्यासोबत चार कार्यकारी अध्यक्ष दिले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com