प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? गांधी परिवारासोबतच्या भेटीतून संकेत - poll strategist prashant kishor may join congress | Politics Marathi News - Sarkarnama

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? गांधी परिवारासोबतच्या भेटीतून संकेत

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जुलै 2021

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. 

नवी दिल्ली : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधींची (Priyanka Gandhi) घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीमागच्या कारणांबाबत वेगवेगळे कयासही लढविले जात आहेत. असे असताना ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांसोबत किशोर यांची बैठक झाली. याआधी अनेक वेळा अशा बैठका झाल्या आहेत. किशोर यांनी काँग्रेसमध्ये रणनीतीकार अशी भूमिका देण्यावर प्रस्ताव समोर आला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम पाहतील, अशी शक्यता यामुळे समोर आली आहे. 

किशोर यांची गांधी परिवारासोबतची बैठक ही केवळ पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. यामागे मोठे कारण आहे. किशोर यांना काँग्रेसमध्ये मोठी भूमिका बजावण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. काँग्रेस पक्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करू लागला आहे. यात किशोर हे महत्वाची भूमिका बजावतील, असे सूत्रांनी सांगितले. 

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर रणनीतीकार म्हणून लक्षवेधी कामगिरी केली होती. बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींची सत्ता आणून भाजपला धूळ चारली होती. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि भाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ममतांचा विजय झाला होता. किशोर यांनी तमिळनाडूत द्रमुकचे एम.के.स्टॅलिन यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 

हेही वाचा : नाना पटोलेंच्या स्वबळाच्या गुगलीवर संजय राऊतांची फटकेबाजी 

बंगाल आणि तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्त होण्याची घोषणा किशोर यांनी केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, मला आता हे काम करायचे नाही. मी खूप काम केले आहे. आता मी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आयुष्यात मी आता वेगळे काही तरी करेन. पुढे काय करायचे यावर मी विचार करतोय. 

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर राजकीय रणनितीकार म्हणून काम करणार नसल्याचे याआधीच जाहीर केले आहे. परंतु, त्यांची आयपॅक ही सल्लागार कंपनी पंजाबमध्ये आधीपासूनच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासाठी काम करत आहे. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू, असा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर किशोर यांची गांधी परिवाराशी भेट झाल्याची चर्चा सुरू होती. परंतु, आता वेगळेच तपशील समोर येऊ लागले आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख