आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल

कोरोनाविषयक निर्बंध असतानाही बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे धुमधडाक्यात लग्न केले होते.
आमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल
police registered case against mla rajendra raut two sons

सोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे धुमधडाक्यात लग्न केले होते. या प्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर अखेर पोलीस प्रशासन जागे झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आमदार राऊतांची दोन्ही मुलं रणजीत आणि रणवीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

कोरोना निर्बंधामुळे सोलापुरात सायंकाळी चार वाजता सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई आहे. सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी चारनंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. याचबरोबर शनिवार- रविवारी संपूर्ण दिवस निर्बंध आहेत. या नियमांना नियमांचे उल्लंघन करुन बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या मुलांचा जंगी विवाह सोहळा केला. या विवाह सोहळ्याप्रकरणी आधी आयोजक योगेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या मुद्द्यावरुन टीका होऊ लागल्यानंतर अखेर पोलिसांनी आमदारांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल केला आहे. 

बार्शीतील लक्ष्मी सोपान बाजार समितीचे आमदार राऊत हे अध्यक्ष आहेत. त्यांची मुले रणजीत आणि रणवीर यांचा विवाह 25 जुलैला सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी थाटामाटात झाला होता. या विवाह सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित होते. या सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. याचबरोबर अनेकांनी मास्क  घातल नव्हते. आमदार राजेंद्र राऊत हे भाजप समर्थक असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक आमदार आणि पदाधिकारी या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. 

पोलिसांनी सुरवातीला या सोहळ्याचे आयोजक योगेश मारुती पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. पवार यांनी या विवाह सोहळ्याच्या परवानगीसाठी बार्शी पोलिसात अर्ज केला होता. केवळ 50 जणांसह  विवाह सोहळा करण्यास पोलिसांनी बजावले होते. प्रत्यक्षात मात्र  हजारो नागरिक या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिले होते. यामुळे पोलिसांनी पवार यांच्या विरोधात आयोजक म्हणून गुन्हा नोंदविला होता. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in