राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना शरद पवार देणार विजयाचा 'कानमंत्र'

मागील विधानसभेसह विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून पराभूत होणार्‍या उमेदवारांसह विजयी उमेदवारांची आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईत बैठक घेणार आहेत.
ncp chief sharad pawar will hold meeting with party leaders in mumbai
ncp chief sharad pawar will hold meeting with party leaders in mumbai

जळगाव : मागील विधानसभेसह विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) चिन्हावर निवडणूक लढवून पराभूत होणार्‍या उमेदवारांसह विजयी उमेदवारांची आज राष्ट्रवादी दककाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे मुंबईत बैठक घेणार आहेत. यात पराभूत उमेदवारांना निवडणुकीवेळी आलेल्या अडचणी सोडविण्यासह आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार हे उमेदवारांशी चर्चा करणार आहेत.

जळगाव दौर्‍यावर आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही माहिती दिली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी पदाधिकार्‍यांच्या बैठका घेत असतात. मात्र, कोरोनामुळे वर्ष-दीड वर्षापासून या बैठका झालेल्या नाहीत. कोरोनामुळे बैठक न  झाल्याने आता  गेल्या निवडणुकांमध्ये पराभूत तसेच विजय उमेदवारांची शरद पवार आज बैठक घेत आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्था, २०२४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मागील काळात जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या अडचणी, प्रश्‍न पवार समजून घेणार आहेत. ते सोडवण्यासाठी नंतर सल्लाही देणार आहेत, असे सुरज चव्हाण यांनी सांगितले. पक्ष संघटनेतील फेरबदलाबाबत त्यांना विचारले असता कुठलेही फेरबदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नाशिकमध्ये पुढील महापौर राष्ट्रवादीचाच 
नशिक महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी सहा महिने स्वत:ला पक्षासाठी वाहून घ्यावे. असे झाल्यास महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल, असा विश्‍वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी येथे व्यक्त केला. 

मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये शेख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की महापालिका निवडणुकीसाठी अवघे सहा महिने राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने रात्रीचा दिवस करावा. आपापल्या विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या भेटी-गाठी घेत समस्या जाणून घ्याव्यात. त्या कशा सोडवता येतील, याकडे लक्ष द्यावे. राजकारण करताना कुठल्याही प्रकारे जातिवाद आणू नये. त्यामुळे विकासाला खीळ बसते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com