मोदींचा मास्टरस्ट्रोक : खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधी आऊट अन् मेजर ध्यानचंद इन!

देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामकरण आता करण्यात आले आहे.
narendra modi renames rajiv gandhi khel ratna to major dhyanchand
narendra modi renames rajiv gandhi khel ratna to major dhyanchand

नवी दिल्ली : देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या राजीव गांधी (Rajiv Gandhi) खेल रत्न पुरस्काराचे (Khel Ratna Award) नामकरण करण्यात आले आहे. मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावाने आता हा पुरस्कार ओळखला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरवर या निर्णयाची माहिती दिली आहे. काँग्रेसला मोदींनी या आडून आणखी एक मास्टरस्ट्रोक मारल्याचे मानले जात आहे. 

भारताच्या पुरुष हॉकी संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिंपिकमध्ये पदक मिळाले आहे. याचबरोबर भारताच्या महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यामुळे भारताच्या महिला व पुरुष हॉकी संघाचे देशभरातून कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेल रत्न पुरस्काराला असलेले दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव काढून टाकले आहे. त्याऐवजी हॉकीचे जादूगार या टोपणनावाने ओळखले जाणार महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचे नाव दिले आहे.  

मोदींनी ट्विटरवर म्हटले आहे की, मेजर ध्यानचंद यांनी भारताला अनेक सन्मान मिळवून दिले. ते भारताच्या महान क्रीडापटूंपैकी एक आहेत. अनेकवेळा त्यांच्यामुळे भारताची मान गर्वाने उंचावली आहे. अनेक देशवासियांनी खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांना समर्पित केला जावा, अशी मागणी केली होती. जनभावनेची कदर करुन आता खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे. जय हिंद! 

संघाला मिळत नव्हता स्पॉन्सर 
हॉकीमधील ऑलिंपिक पदकांचा दुष्काळ संपवत पुरूष संघानं इतिहास घडवला. तब्बल 41 वर्षांच्या खंडानंतर भारताला हॉकीत पदक मिळवण्यात यश आलं आहे. त्यामुळं देशभरातून या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण याच संघाला 2018 मध्ये स्पॉन्सर मिळत नव्हता. मुख्य स्पॉन्सर सोडून गेल्यानंतर भारतीय हॉकीसमोर अंधार होता. पण देशातील एका गरीब राज्याचे मुख्यमंत्री धावून आले अन् त्यांनी मदतीचा हात दिला होता. 

पुरूषांच्या हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. या संघाने जर्मनीचा 5-4 ने पराभव करत इतिहास घडवला. यापूर्वी भारताला हॉकीमध्ये 1980 मध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. त्यानंतर भारताला पदकासाठी 41 वर्ष वाट पहावी लागली. हे पदक मिळवण्यात ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचाही हातभार लागला आहे. पटनाईक सरकारच्या स्पॉन्सरशिपखाली संघानं हे पदक मिळवलं आहे. ओडिशा हे देशातील एक छोटं राज्य आहे. पण हॉकीला नवसंजीवनी देत या राज्यानं मोठं काम केल्याचं कौतुक सोशल मीडियात होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com