काँग्रेसमध्ये मोठी घडामोड...पटोलेंसह अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल - nana patole will meet congress leader rahul gandhi in delhi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

काँग्रेसमध्ये मोठी घडामोड...पटोलेंसह अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 जुलै 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. 
 

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomathi Thakur) दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादावर हे नेते चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. विरोधकांनी हा मुद्दा उचलून आघाडी सरकावर टीका केली. यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे हे कसले सरकार चालवणार, असा टोला विरोधकांनी लगावला. स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा, अशा पटोलेंच्या जाहीर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीनाट्य दिसून येत आहे. 

पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीत निर्माण झालेले मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी पुढाकार घेतला होता.  पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. पाटील यांनी पवारांची भेट घेतली त्यावेळी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोराl यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. परंतु, पटोले हे उपस्थित नव्हते. 

पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि पवारांशी चर्चा केल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या हाय कमांडकडे सादर केला आहे. यानंतर हाय कमांडने आज नाना पटोले यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. पटोले यांच्याकडे राज्यातील सरकारमधील मतभेदांबाबत विचारणा केली जाणार आहे. पटोले हे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा : काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर...प्रदेशाध्यक्षांविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीला 

पटोले यांच्यासह राज्यातील इतर काँग्रेस नेतेही दिल्लीत दाखल झालेत. अशोक चव्हाण आणि यशोमती ठाकूर हे मंत्री दिल्ली दौऱ्यावर आहेत. हे नेतेही काँग्रेस हाय कमांडची भेट घेऊन राज्यातील घडामोडींचा तपशील मांडणार आहेत. नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेत्यांना हाय कमांडने बोलावून घेणे महत्वपूर्ण आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख