शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा पॉर्न फिल्म तयार करुन पाठवत होता विदेशात

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
mumbai police arrest actress shilpa shetty husband raj kundra
mumbai police arrest actress shilpa shetty husband raj kundra

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. हे मोठे रॅकेट असून, यामागील सूत्रधार राज कुंद्रा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या  गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली. पॉर्नोग्राफी प्रकरणात तो मुख्य सूत्रधार आहे.

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या फेब्रुवारीमध्ये या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.  

पोलिसांनी चौकशीसाठी कुंद्राला समन्स बजावले होते. त्यानुसार काल (ता.19) कुंद्रा याची चौकशीसाठी हजर झाला. त्याची चौकशी करुन त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, कुंद्रा याने या प्रकरणात त्याचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला आहे. त्याने या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com