महिला, दलित, ओबीसी मंत्री झाल्याचे काहींना पाहवत नाही, असं म्हणत मोदी संतापून सभागृहाबाहेर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पारा चढला.
narendra modi says some cant digest more women sc st as ministers
narendra modi says some cant digest more women sc st as ministers

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास (Parliament Session) आजपासून सुरवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) पारा चढला. मोदी हे नवीन मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन देत असताना विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे मोदी संतापले आणि त्यांनी विरोधकांना सुनावले. महिला, दलित, शोषित मंत्री झालेले काही जणांना पाहवत नाही, अशी टीका त्यांनी केली. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरवात झाली. हे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून, यात १९ बैठका प्रस्तावित आहेत. संसद कामकाजास २१ जुलैला बकरी ईदनिमित्त सुटी राहील. आजचा गोंधळ पाहता पहिल्याच आठवड्यातील उर्वरित तीन दिवसांमध्ये कितपत कामकाज होईल, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील सरकारी पातळीवरचे गैरव्यवस्थापन, ऑक्सिजन टंचाई, लसटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई यासारखे मुद्दे विरोधकांकडे आहेत. 

विरोधकांनी आजच्या दिवशी कामकाज स्थगित करून यापैकी काही मुद्द्यांवर चर्चा घेण्याचा प्रस्ताव दिला. अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळला. यानंतर गोंधळाला सुरवात झाली. त्याचवेळी पंतप्रधान मोदी सभागृहात आले. काँग्रेस समाजवादी पक्ष, आप आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य घोषणाबाजी करत राज्यसभेच्या हौद्यात उतरले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच होणाऱ्या अधिवेशनात पंतप्रधान नवीन मंत्र्यांचा परिचय करून देतात. मोदी यांना आज बोलण्यास दोन्ही सभागृहात संधी न मिळाल्याने ते संतापले. 

मंत्रिमंडळात ११ महिला सदस्यांचा समावेश झाला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिला मंत्रिपदी आल्या आहेत. या वर्गाला मंत्रिपदे मिळाल्याचे काही जणांना पचत नाही. त्यामुळे ते आज मला मंत्र्यांचा परिचय करू देत नाहीत, असे मोदी म्हणाले. नंतर मोदींनी नव्या मंत्र्यांची यादी राज्यसभेच्या सभापटलावर ठेवली आणि संतापात ते तडक सभागृहाबाहेर निघून गेले. 

विरोधकांनी बोलू न दिल्याबद्दल मोदी यांनी त्रागा केल्यानंतर काँग्रेसने भाजपला आरसा दाखवला आहे. डॉ. मनमोहनसिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांनी समाजमाध्यमांवर भाजपच्या गोंधळाची आठवण करून दिली आहे. बारू यांनी म्हटले  आहे की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना 2004 मध्ये नव्या मंत्र्यांची ओळख आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तरही देऊ दिले नव्हते. भाजपने 2004च्या पराभवानंतर सलग 10 वर्षे लोकसभा आणि राज्यसभेत मोठा गोंधळ केला होता. भाजपच्या आणि विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे 2009 ते 2014 या काळात संसदेचे नीचांकी कामकाज झाले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com