मुंबईत ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचा मोठा डाव? चहल यांना ईडीची नोटीस अन् पेडणेकरांवर...

Uddhav Thackeray News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल (IqbalSingh Chahal) यांना ईडीने समन्स बजावले आहे.
Iqbal Singh Chahal, Kishori Pednekar, Uddhav Thackeray News
Iqbal Singh Chahal, Kishori Pednekar, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Uddhav Thackeray News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल (IqbalSingh Chahal) यांना ईडीने समन्स बजावले आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे चहल आणि पेडणेकर यांच्यामागे चौकशीची ससेमिरा लावून भाजपने उद्धव ठाकरे यांना घेरले असल्याची चर्चा सुरु आहे.

चहल यांची चौकशी कोरोनाकाळात पालिकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराबाबत होणार असल्याची माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेची मुदत संपून अनेक महिने झाले आहेत. मात्र, अजुनही पालिका निवडणुकांची घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य करण्याची एकही संधी भाजप सोडत नसल्याचे चित्र आहे.

Iqbal Singh Chahal, Kishori Pednekar, Uddhav Thackeray News
ED च्या समन्सवर चहल यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, 'ईडीच्या चौकशीत..'

याआधीच भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी चहल आणि पेडणेकर यांच्या कशीची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर आता अखेर चहल यांना ईडीकडून समन्स पाठवण्यात आले तर पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोना काळात महापालिकेच्या रुग्णालयांची कामे लाइफलाइन या कंपनीकडे देण्यात आली होती. ही कंपनी खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांच्या मालकीची असल्याची चर्चा आहे. या कंपनीकडून आरोग्य सेवा पुरवताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला असून याबाबतची कागदपत्रे घेऊन चहल यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे चहल यांच्या चौकशीच्या आधारे पुन्हा एकदा संजय राऊत चौकशीच्या फेऱ्यांत अडकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे, पेडणेकर यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. किरीट सोमय्या यांनी टि्वट ही माहिती दिली आहे. वरळी येथील गोमाता इमारत ही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधण्यात आली आहे.

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी बेकायदेशीरपणे या इमारतीमधील सदनिका बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे चहल आणि पेडणेकर यांच्यावर आरोप करुन उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

महानगरपालिकेवर भाजपचा (BJP) झेंडा फडकवण्याचे स्वप्न पक्षाच्या अनेक नेत्यांकडून बोलावून दाखवण्यात आले आहे. मागील निवडणुकीतही भाजपने येथे आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र, शिवसेनेपेक्षा अवघ्या दोन जागा कमी मिळाल्या आणि भाजपचे स्वप्न भंगले. मात्र, यावेळी कोणतीही कसर ठेवू नये, असा भाजपचा इरादा आहे.

Iqbal Singh Chahal, Kishori Pednekar, Uddhav Thackeray News
Devendra Fadnavis News : शिर्डी विमानतळावर फडणवीस अ्न विखेंमध्ये गुप्त चर्चा; नाशिकबद्दल खलबतं?

शिवसेनेतील बंडखोरीनंतरही स्वबळावर महापालिका जिंकली जाऊ शकते की नाही, याबाबत भाजपच्या गोटात साशंकता आहे. त्यातूनच महापालिका निवडणुकांना उशीर केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वेगवेगळे आरोप करुन शिवसेना ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com